एटीएमची चार कोटी रुपयांची रोकड घेऊन चालक पसार

ATM मध्ये पैसे भरणारी गाडीच चालकाने पळवून नेली. या गाडीत तब्बल चार कोटी रुपयांची रोकड होती. आगाशी बोळींज येथील कोटक महिंद्रा एटीएम (Kotak Mahindra Bank ATM) येथे हा प्रकार घडला आहे.

Updated: Nov 13, 2020, 08:31 AM IST
एटीएमची चार कोटी रुपयांची रोकड घेऊन चालक पसार  title=
संग्रहित छाया

वसई : ATM मध्ये पैसे भरणारी गाडीच चालकाने पळवून नेली. या गाडीत तब्बल चार कोटी रुपयांची रोकड होती. आगाशी बोळींज येथील कोटक महिंद्रा एटीएम (Kotak Mahindra Bank ATM) येथे हा प्रकार घडला आहे.

विरार पश्चिमेकडील बोळींज भागातील असलेल्या कोटक महिंद्रा बँकेत (Kotak Mahindra Bank) पैसे भरण्यासाठी आलेले पैसे भरणारे वाहनच चक्क ड्रायव्हरने पळवून नेल्याची धक्कादायक घटना काल संध्याकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. आनंद महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी गाडीतून मॅनेजर आणि बॉडिगार्ड उतरल्यावर हा प्रकार घडला.

गाडी पळवून नेणाऱ्या चालकाचा शोध घेण्यासाठी मुंबई अहमदाबाद महामार्गावर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चार ते सव्वा चार करोड रुपये हे गाडीत आहे. ही रक्कम चालकाने पळवल्याचे सांगितले जात आहे. आरोपीचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.