विधिमंडळ शिष्टमंडळ जपानच्या अभ्यास दौऱ्यावर, ठाकरे गटाच्या आमदारांचा उल्लेख शिवसेना यादीत

Legislature delegation on study tour to Japan : विधीमंडळाचे 21 सदस्यांचं शिष्टमंडळ जपानला अभ्यास दौऱ्यावर जाणार आहे.  काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना अशा सर्वपक्षीय आमदारांचा या शिष्टमंडळात समावेश आहे. दौऱ्यावर जाणारे सर्वाधिक आमदार काँग्रेसचे आहेत.  

Updated: Apr 11, 2023, 03:00 PM IST
विधिमंडळ शिष्टमंडळ जपानच्या अभ्यास दौऱ्यावर, ठाकरे गटाच्या आमदारांचा उल्लेख शिवसेना यादीत  title=

Legislature delegation on study tour to Japan : विधीमंडळाचे 21 सदस्यांचं शिष्टमंडळ जपानला अभ्यास दौऱ्यावर जाणार आहे. विशेष म्हणजे या शिष्टमंडळात ठाकरे गटाचे आमदारही शिवसेना यादीत दाखवण्यात आलेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना अशा सर्वपक्षीय आमदारांचा या शिष्टमंडळात समावेश आहे. 

विधीमंडळाने तयार केलेल्या यादीत ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या आमदारांचा उल्लेख शिवसेना असाच करण्यात आला आहे. जपान दौऱ्यावर दोन्ही गटांचे आमदार एकाच पक्षाचे म्हणून जाणार आहेत. हा जपान दौरा 11 ते 21 एप्रिल असा आहे. दौऱ्यावर जाणारे सर्वाधिक आमदार काँग्रेसचे आहेत. यादीत नीलम गोऱ्हे, मनिषा कायंदे, किशोर पाटील, ज्ञानराज चौगुले या चारही आमदारांचा उल्लेख शिवसेना असाच करण्यात आला आहे. यातले दोन आमदार ठाकरे गटाचे तर दोन आमदार शिंदे गटाचे आहेत. 

दरम्यान, याआधीही मंत्र्यांनी परदेश दौरे केले होते. त्यावरुन जोरदार टीकाही झाली होती. तसेच राज्यातील पाच अधिकाऱ्यांचा इस्रायल दौऱ्याचा मुद्दा समोर आला होता. राज्यात 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सराकर स्थापन झाल्यानंतर माहिती आणि जनसंपर्क विभागातील पाच अधिकारी इस्रायल दौऱ्यावर गेले होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यानुसार हा दौरा पूर्वनियोजित होता. तर शेती आणि माध्यम या विषयाशी संबंधित हा दौरा होता. विशेष म्हणजे केवळ मुख्य सचिवांची परवानगी घेऊन हे अधिकारी दौऱ्यावर गेले असल्याची माहिती उघड झाली. त्यानंतर या दौऱ्याच्या सखोल चौकशीचा अहवाल ठाकरे सरकारने मागवला होता. 

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना  29 डिसेंबर 2014,  24 ऑगस्ट 2015,  2 जून 2016 आणि त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 1 फेब्रुवारी 2021 रोजी वेळोवेळी शासन निर्णयातून अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांच्या सूचना आणि मार्गदर्शक तत्व जाहीर करण्यात आली आहेत. काही फरकाने हे नियम सारखेच आहेत.