दीपक भातुसे, मुंबई : राज्यपाल नियुक्त १२ जागांचा नावांची यादी बंद लिफाफ्यात महाविकासआघाडी सरकारने राज्यपालांकडे सादर केली आहेत. अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे. '१२ जागांच्या नावाची यादी बंद लिफाफ्यात राज्यपालांना दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्रासह ही यादी देण्यात आली आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून ही यादी दिली.' असल्याचं अनिल परब यांनी म्हटलं आहे.
राज्यपाल ही नावं जाहीर करतील अशी अपेक्षा आहे. आम्ही कायदेशीर बाबी पूर्ण करून यादी दिली आहे, नावं बंद पाकिटात दिली आहेत. राज्यपाल ती जाहीर करतील. असं देखील अनिल परब यांनी म्हटलं आहे.
दोन आठवड्यांपूर्वी महाविकास आघाडी सरकारने १२ जागांचा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूर केला होता. आज अनिल परब, नवाब मलिक आणि अमित देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेतली.
12 जणांची नावे खालील प्रमाणे
एकनाथ खडसे - समाजसेवा आणि सहकार
राजू शेट्टी - सहकार आणि समाजसेवा
यशपाल भिंगे - साहित्य
आनंद शिंदे - कला
रजनी पाटील - समाजसेवा आणि सहकार
सचिन सावंत - समाजसेवा आणि सहकार
मुझफ्फर हुसेन - समाजसेवा
अनिरुद्ध वनकर - कला
शिवसेना
उर्मिला मातोंडकर - कला
नितीन बानगुडे पाटील - शिवव्याख्याते
विजय करंजकर - शिवसेना नाशिक जिल्हाध्यक्ष
चंद्रकांत रघुवंशी - नंदुरबार, पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आमदार