Shiv Sena MLA Disqualification Result LIVE: शिंदेंचा गट हीच खरी शिवसेनाः राहुल नार्वेकर

MLA Disqualification Hearing LIVE: राज्यातल्या सत्तानाट्याचा आज निवाडा. शिवसेना आमदार अपात्रतेचा आज निकाल. विधानसभा अध्यक्ष करणार फैसला. ऐतिहासिक निर्णयाकडे संपूर्ण देशाचं लक्ष  

Shiv Sena MLA Disqualification Result LIVE: शिंदेंचा गट हीच खरी शिवसेनाः राहुल नार्वेकर

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: राज्याच्या राजकारणात अखेर तो महत्त्वाचा दिवस उजाडला असून, या दिवशी नेमक्या कोणत्या नाट्यमय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं  ठरणार आहे. कारण राज्याच्या सत्तानाट्याचा निवाडा अखेर होणार आहे. 

राज्यात उलथापालथ घडवणाऱ्या सत्तासंघर्षावर बुधवारी फैसला होणार असून, शिवसेना आमदार अपात्रतेता निकाल आज लागणार आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार की ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार याचा फैसला अवघ्या काही तासांमध्ये लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर संध्याकाळी चार वाजता शिवसेना आमदार अपात्रता निकालाचं वाचन विधानसभा अध्यक्ष करणार आहेत. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधानसभा अध्यक्ष निकालाचे वाचन करतील. 500 पानांच्या निकालपत्रातून महत्त्वाचे मुद्दे घेत ते निकाल वाचतील. निकालाची मुळ प्रत दोन्ही गटाच्या वकिलांना नंतर दिली जाणार आहे. 

10 Jan 2024, 16:22 वाजता

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: मेरिटप्रमाणे निकाल द्यावी ही अपेक्षाः मुख्यमंत्री शिंदे

निकाल  मेरिटवर आला पाहिजे. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे. बहुमत आमच्याकडे आहे. अधिकृत पक्षसुद्धा आमच्याकडे आहे. धनुष्यबाण आमच्याकडे आहे. त्यामुळे अध्यक्षांकडून अपेक्षा आहे की मेरिट प्रमाणे त्यांनी हा निकाल द्यावाः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

10 Jan 2024, 16:18 वाजता

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: निकालाचं काउंटडाऊन, दोन्ही गटाचे वकील विधानभवनात दाखल

10 Jan 2024, 16:15 वाजता

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: निकालाचं काउंटडाऊन, दोन्ही गटाचे वकील विधानभवनात दाखल

10 Jan 2024, 16:10 वाजता

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या बंगल्यावर सुरक्षा वाढवली आहे

10 Jan 2024, 16:05 वाजता

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. आमदार अपात्रता निकालाआधी राजकीय वर्तुळात चर्चा.

10 Jan 2024, 15:46 वाजता

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: तब्बल दीड तास चर्चा केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत मातोश्रीबाहेर. 

10 Jan 2024, 15:05 वाजता

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

आज चार वाजता सुनावणी आहे. अध्यक्ष महोदयांनी भेटीगाठी घेतली आहे. त्या पदाची शोभा कमी करुन टाकली आहे. त्या पदाला एक वेगळीच गरीमा आहे आणि वेगळीच उंची आहे. ते सांभाळण्याचं काम अध्यक्षांनी करायला हवं होतं, अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली आहे. 

10 Jan 2024, 14:52 वाजता

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: निकालाची मंत्र्यंमध्येही उत्सुकता 

आमदार अपात्रता निकालासंदर्भात आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली असून, निकाल काय लागणार, याविषयी मंत्र्यांमध्येही उत्सुकता पाहायला मिळत आहे. निकाल कुणाच्या बाजून लागू शकतो, निकालानंतरची राजकीय परिस्थिती, परिणाम याविषयी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. निकाल काहीही लागला तरी सरकारला धोका नसल्याने मंत्रीमंडळ मात्र बिनधास्त पाहायला मिळालं. 

10 Jan 2024, 14:03 वाजता

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: मातोश्रीवर सुरक्षा वाढवली... 

आमदार अपात्रता संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान निकाल देणार आहेत. त्याच अनुषंगाने मातोश्रीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले. निकाल कोणत्या बाजूने येईल आपल्या बाजूने आल्यास काय करायचे किंवा न आल्यास पुढची काय रणनीती असेल यासंदर्भात चर्चा करण्यासाठी संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचल्याचं सांगितलं जात आहे. ज्यामुळं मातोश्रीबाहेर आज इतर दिवसांपेक्षा जास्त प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

 

10 Jan 2024, 13:19 वाजता

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय देणारेत.निकालापूर्वी माध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकरांनी प्रतिक्रिया दिली. निकालात कुठल्याही त्रुटी राहणार नाहीत, असं त्यांनी म्हटलंय. संविधानात ज्या लिखित तरतूदी आहेत, त्या सर्व तरतूदींना अनुसरुनच निर्णय असेल, तसंच निर्णय देताना कायद्याचं पालन होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.