Shiv Sena MLA Disqualification Result LIVE: शिंदेंचा गट हीच खरी शिवसेनाः राहुल नार्वेकर

MLA Disqualification Hearing LIVE: राज्यातल्या सत्तानाट्याचा आज निवाडा. शिवसेना आमदार अपात्रतेचा आज निकाल. विधानसभा अध्यक्ष करणार फैसला. ऐतिहासिक निर्णयाकडे संपूर्ण देशाचं लक्ष  

Shiv Sena MLA Disqualification Result LIVE: शिंदेंचा गट हीच खरी शिवसेनाः राहुल नार्वेकर

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: राज्याच्या राजकारणात अखेर तो महत्त्वाचा दिवस उजाडला असून, या दिवशी नेमक्या कोणत्या नाट्यमय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं  ठरणार आहे. कारण राज्याच्या सत्तानाट्याचा निवाडा अखेर होणार आहे. 

राज्यात उलथापालथ घडवणाऱ्या सत्तासंघर्षावर बुधवारी फैसला होणार असून, शिवसेना आमदार अपात्रतेता निकाल आज लागणार आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार की ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार याचा फैसला अवघ्या काही तासांमध्ये लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर संध्याकाळी चार वाजता शिवसेना आमदार अपात्रता निकालाचं वाचन विधानसभा अध्यक्ष करणार आहेत. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधानसभा अध्यक्ष निकालाचे वाचन करतील. 500 पानांच्या निकालपत्रातून महत्त्वाचे मुद्दे घेत ते निकाल वाचतील. निकालाची मुळ प्रत दोन्ही गटाच्या वकिलांना नंतर दिली जाणार आहे. 

10 Jan 2024, 12:46 वाजता

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार - पृथ्वीराज चव्हाण

आज आपण ज्या व्यक्तीला मत दिलं होतं ती व्यक्ती त्या पक्षात आहे का हेच मतदारांना ठाऊक नाही आणि हे राजकीय नेते किंवा पक्ष म्हणून आपल्याला सांगता आलं नाही तर हे घटनात्मक व्यवस्थेचं अपयश आहे. त्यामुळं हा कायदाच बदलला पाहिजे. या साऱ्याचे राजकीय परिणाम गंभीर असतील. कारण, 16 आमदारांना निलंबित करून त्यांचं मंत्रीपद गेलं आणि ते पुन्हा मंत्रीपदावर येणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली तर हा मोठा राजकीय भूकंप असेल, असं वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं. 

10 Jan 2024, 12:41 वाजता

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: धनुष्यबाण आणि शिवसेना आमचीच- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

न्यायालयानं शिवसेना हे नाव आणि पक्षाचं चिन्हं आमच्या गटाला दिल्यामुळं आम्हीच शिवसेना आहोत. आमच्याकडे आमदारांचा आकडाही जास्त आहे. परिणामी आमदार अपात्रताप्रकरणीचा निकाल मेरिटवर लागणार असून, आमचं सरकार घटनाबाह्य् नाही. सरकार पडेल, मुख्यमंत्री बदलेल असं म्हणणाऱ्यांना आता पराभव स्पष्टपणे दिसत असल्यामुळं त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, असं मुख्यमंत्री एकनाश शिंदे स्पष्टपणे म्हणाले. ही मॅच फक्सिंग असती तर विधानसभा अध्यक्ष रात्रीच वर्षावर पोहोचले असते, ते तर दिवसाढवळ्या तिथं आहे, ते स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आले होते, असंही ते म्हणाले. 

10 Jan 2024, 12:30 वाजता

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: मुख्यमंत्र्यांनी निकालापूर्वी आमदारांना दिले आदेश 

शिवसेना आमदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब भवन येथे बोलवलं असून, सर्वांनाच दुपारी 3 वाजेपर्यंत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सायंकाली 4 वाजण्याच्या सुमारास हा निकाल जाहीर होताच हे सर्व आमदार विधानभवनावर जाणार आहेत. 

10 Jan 2024, 11:10 वाजता

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: 40 गद्दार बाद झालेच पाहिजेत 

'इथं दोनतीन बाजू पाहण्याजोग्या आहे, विधानसभेच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना भेटणं म्हणजे न्यायमूर्तींनी आरोपीची भेट घेण्याजोगं आहे. देशाच्या संविधानाच्या मार्गानं गेल्यास 40 गद्दार बाद झाल्याचाच निर्णय येणं अपेक्षित आहे. कोणत्याही पक्षासाठी नव्हे हा निर्णय देशासाठी महत्त्वाचा', असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी विरोधी गटावर घणाघात करत, विधानसभा अध्यक्षांनी संविधानाला अनुसरून निर्णय द्यावा असं आवाहन केलं. 

10 Jan 2024, 11:07 वाजता

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: निकाल दिल्लीतच लागलाय, आता फक्त...- संजय राऊत 

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याचा उल्लेख करत आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर जो निकाल देणार आहेत तो 'मॅच फिक्सिंग' असल्याचं म्हटलं आहे. "मॅच फिक्सिंग कसं असावं हे ठरवण्यासाठी भेटले. हे सर्वोच्च न्यायालयाच्या रेकॉर्डवर असणार. नरेंद्र मोदी 12 तारखेला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. एवढा आत्मविश्वास त्यांच्यात कुठून आला. 10 तारखेला घटनाबाह्य सरकारचा फैसला लागणार आहे. सरकार घटनाबाह्य आहे हे आम्हाला माहितीये? हे घटनाबाह्य सरकार टीकवलं जाणार हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला निकाल माहिती आहे का? याचा अर्थ प्रधानामंत्र्यांनी निर्णय माहिती आहे. निर्णय दिल्लीत झाला आहे. त्यावर फक्त आता शिक्का मारणार आहेत," असं राऊत म्हणाले.

 

10 Jan 2024, 11:04 वाजता

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: मुंबईमध्ये कडेकोट बंदोबस्त 

बुधवारी महाराष्ट्राच्या राजकारणातला ऐतिहासिक निर्णय लागणार आहे. शिवसेना पक्षातील कोणता गट अपात्र ठरतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतानाच या सुनावणीनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहू नये म्हणून मुंबईतील विविध भागात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

10 Jan 2024, 10:59 वाजता

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: निकाल आमच्याच बाजूने... 

'निकाल आमच्या बाजुने लागेल. कायद्याच्या कसोटीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमच्या बाजुने निकाल देतील', असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी केलं आहे.

 

10 Jan 2024, 10:41 वाजता

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: निकालाचं लाईव्ह स्ट्रीमिंग

विधीमंडळातील आमदार अपात्रता निकाल वाचनाचे लाईव्ह स्ट्रिमींग होणार आहे. ठाकरे विरूद्ध शिंदे गटाच्या अपात्र आमदार सुनावणीसाठीचं निकालवाचनाचं थेट प्रक्षेपण विधानभवन लिंकवरून करण्याची शक्यता आहे. पारदर्शकता आणि निकाल स्पष्टता असावी यासाठी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांची ही भूमिका असल्याचं सांगितलं जात आहे. निकाल वाचन लाईव्ह लिंक माध्यम आणि जनतेला विधीमंडळ लिंक यावर दिली जाण्याची शक्यता आहे. 

10 Jan 2024, 09:34 वाजता

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: बेंचमार्क ठरणारा निर्णय 

अपात्र आमदार याचिका प्रकरणात सर्वांनाच न्याय मिळणार असून, निकाल देताना कायद्याचं पालन केलं जाईल. हा बेंचमार्क ठरणारा निर्णय असेल. या निर्णयामध्ये कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत असं वक्तव्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलं. 

 

10 Jan 2024, 09:31 वाजता

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: विजय आमचाच...!

सत्तासंघर्षामध्ये विजय आमचाच होणार, कायद्याच्या बाजू समोर येऊन अध्यक्ष तसाच निर्णय देतील. निकालानंतर अनेकजण शिंदे गटात प्रवेश करणार, असा दावा आमदार अपात्रता निकालापूर्वी शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनी केला.