Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: राज्याच्या राजकारणात अखेर तो महत्त्वाचा दिवस उजाडला असून, या दिवशी नेमक्या कोणत्या नाट्यमय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण राज्याच्या सत्तानाट्याचा निवाडा अखेर होणार आहे.
राज्यात उलथापालथ घडवणाऱ्या सत्तासंघर्षावर बुधवारी फैसला होणार असून, शिवसेना आमदार अपात्रतेता निकाल आज लागणार आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार की ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार याचा फैसला अवघ्या काही तासांमध्ये लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर संध्याकाळी चार वाजता शिवसेना आमदार अपात्रता निकालाचं वाचन विधानसभा अध्यक्ष करणार आहेत. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधानसभा अध्यक्ष निकालाचे वाचन करतील. 500 पानांच्या निकालपत्रातून महत्त्वाचे मुद्दे घेत ते निकाल वाचतील. निकालाची मुळ प्रत दोन्ही गटाच्या वकिलांना नंतर दिली जाणार आहे.
10 Jan 2024, 09:03 वाजता
Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: आमदार अपात्रता प्रकरणी कोणत्या गटातून कोणाकोणाची नावं पुढे?
शिंदे गट- एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, संजय शिरसाट, तानाजी सावंत, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, भरत गोगावले, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमूलकर, रमेश बोरणारे, बालाजी कल्याणकर
ठाकरे गटाचे आमदार- अजय चौधरी, रवींद्र वायकर, राजन साळवी, वैभव नाईक, नितीन देशमुख, सुनील राऊत, सुनील प्रभू, भास्कर जाधव, राहुल पाटील, रमेश कोरगावकर, प्रकाश फातर्पेकर, उदयसिंह राजपूत
10 Jan 2024, 08:11 वाजता
Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: आदित्य ठाकरेंनी बोलवली बैठक
आदित्य ठाकरे यांनी बोलावली महाविकस आघाडीच्या स्थानिक नेत्यांची बैठक. हॉटेल सयाजी मध्ये नऊच्या दरम्यान ही बैठक सुरु होणार असून, या बैठकीला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांचा समावेश असणार आहे.
हेसुद्धा वाचा : Shiv Sena MLA Disqualification : कोणत्याही बाजूने निकाल लागला तरी 'या' 2 आमदारांची आमदारकी कायम राहणार, कारण...
10 Jan 2024, 08:07 वाजता
Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: एका भेटीमुळं बळावल्या अनेक शंका
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षावर जाऊन घेतलेल्या भेटीवर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी जोरदार टीका केलीय. या भेटीमुळे शंकेला वाव आहे असा आरोप पवारांनी केलाय. तर न्यायाधीशच आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर न्यायाची अपेक्षा कुणाकडून करणार असा सवाल ठाकरेंनी केलाय.
10 Jan 2024, 07:55 वाजता
Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: महायुती सरकार नियमाने स्थापन झालं आहे- मुख्यमंत्री
'महायुती सरकार नियमाने स्थापन झालं आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हही आमच्याकडे आहे. त्यामुळं मेरिटप्रमाणे आमदार अपात्रता निकाल लागावा' अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. तर, योग्य कायदेशीर अपेक्षित निर्णयच अध्यक्ष घेतील असं म्हणताना आमची बाजू भक्कम असून असल्यानं अध्यक्ष आम्हाला न्याय देतील अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
10 Jan 2024, 07:04 वाजता
Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: निर्णयातून दोन आमदार सुरक्षित
शिवसेना आमदार अपात्रता निकालामुळे सर्वांचीच धाकधूक वाढलीय.. मात्र या संपूर्ण घडामोडीत ठाकरे गटाचे दोन आमदार मात्र सुरक्षित आहेत. थोडक्यात ठाकरे गटाच्या दोन आमदारांवर अपात्रता निकालाचा कोणताही परिणाम होणार नाहीये. हे दोन आमदार आहेत आदित्य ठाकरे आणि ऋतुजा लटके. शिंदे गटाने आमदार अपात्रता याचिका दाखल करताना आदित्य ठाकरेंचं नाव वगळलं होतं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू असल्याने त्यांच्यावर अपात्रता कारवाई करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. दुसरीकडे आमदार ऋतुजा लटके या देखील आमदार अपात्रतेच्या कारवाईपासून दूर असणार आहेत. मशाल या चिन्हावर ऋतुजा लटके निवडून आल्या आहेत..