Lockdown: आता राज्यात याशिवाय प्रवेश नाही, महाविकास आघाडीचा मोठा निर्णय

राज्यातील कोरोनाचे (Coronavirus) संकट अद्याप संपलेले नाही. ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक दिसून येत आहे.  

Updated: May 13, 2021, 02:08 PM IST
Lockdown: आता राज्यात याशिवाय प्रवेश नाही, महाविकास आघाडीचा मोठा निर्णय
संग्रहित फोटो

मुंबई : राज्यातील कोरोनाचे (Coronavirus) संकट अद्याप संपलेले नाही. ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक दिसून येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) ब्रेक द चेनअंतर्गत ( Break The Chain) पुन्हा 15 दिवसांनी लॉकडाऊन ( Maharashtra Lockdown) वाढवला आहे. 31 मेपर्यंत निर्बंध कायम असणार आहे. यावेळी राज्य सरकारने काही नव्याने निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांची अंमलबजावणी केले तरच राज्यात प्रवेश मिळेल, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. राज्यात ज्यांना जायचे आहे आणि यायचे आहे, त्याच्यासाठी 48 तास आधीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असणे बंधनकारक आहे. हा निगेटिव्ह रिपोर्ट असेल त्याला राज्यात आणि जिल्ह्यात प्रवेश करता येणार आहे.

राज्य सरकारने सरकारने लॉकडाऊन (Lockdown) वाढवण्याचा निर्णय घेतला असून अधिकृत आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. सरकारने परराज्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी निगेटिव्ह आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट बंधनकार केला आहे. त्याशिवाय बाहेरील राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करता येणार नाही. हा रिपोर्ट 48 तास आधी काढलेला असावा, असे आदेशात म्हटले आहे. दरम्यान देशातील कोणत्याही भागातून राज्यात येणाऱ्यांसाठी आधीचे नियम लागू असणार आहेत.

ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अनेक शहरात कोविडचे नियम पाळण्यात येत नाहीत. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने स्थानिक बाजारपेठा तसेच एपीएमसीवर नगरपालिकांनी लक्ष ठेवून कोरोनाच्या नियमांचे पालन होत आहे की नाही याची खबरदारी घेण्याची सूचना देताना जबाबदारी असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. जर एखाद्या ठिकाणी कोविड नियमांचे पालन होत नसेल किंवा परिस्थिती हाताळणे शक्य होत नसेल तर स्थानिक प्रशासन तिथे निर्बंध वाढवण्याचा किंवा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते,  असे नव्या आदेशात म्हटले आहे.