मुंबई : lok sabha election 2019 सात टप्प्यांमध्ये घेण्यात आलेल्या निवड़णुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर संपूर्ण देशात राजकीय वातावरणाला उधाण आलं. कोण जिंकणार, कोण हरणार याविषयीच्या चर्चा रंगण्यास सुरुवात झाली.
पहिल्या सत्रातील मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर आता याचे थेट पडसाद अर्थव्यवस्थेवही होताना दिसत आहेत. सेंसेक्सवरही भाजपाची जादू पाहायला मिळत आहे. पहिल्या सत्रातील कल हाती येताच आणि भाजपच्या पारड्यात आघाडीचे जास्त आकडे दिसताच सेंसेक्सने ६०० अंकांची उसळी घेतली होती. दरम्यान सध्या हाती येणाऱ्या माहितीनुसार सेंसेक्सने ४० हजारांचा आकडा गाठला आहे. पहिल्यांदाच सेंसेक्समध्ये ही अशा प्रकारची विक्रमी उसळी पाहायला मिळत आहे. त्यामुळे य़ेत्या काळात निवडणूक निकालांचे थेट पडसाद सेंसेक्सवरही दिसत असल्याचं नाकारता येत नाही.
Sensex currently at 40,015.49 https://t.co/hnY9iW4Mz0
— ANI (@ANI) May 23, 2019
Sensex up by more than 600 points as early trends show a return to power of NDA Government pic.twitter.com/GpIQ7Agjir
— ANI (@ANI) May 23, 2019
संपूर्ण दिवसभरात सेंसेक्स आणि निफ्टीच्या आकड्यावर अनेकांच्या नरा राहणार आहेत. निफ्टीचा हा आकडा जवळपास १२ हजारांचा आकडा ओलांडणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात येत आहे.