LokSabha Election: उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटाकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अॅडल्ट स्टारचा वापर केला जात आहे असा आरोप भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wagh) यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रात पॉर्न, पब आणि पार्टीची संस्कृती आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ही जाहिरात कंपनी आणि उद्धव ठाकरेंचा काय संबंध? तसंच पब संस्कृतीशी काही संबंध आहे का? याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे अशी मागणी चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
"उद्धव ठाकरे यांच्या ज्या जाहिराती येत आहेत, त्यात जे पात्र आहे ते अॅडल्ट स्टार आहे. महाराष्ट्रात अतिशय किळसवाणी पब, पार्टी आणि पॉर्नची संस्कृती आणू पाहणाऱ्यांच्या आदुबाळ नाईट लाईफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रोडक्शनने तयार केलेल्या जाहिरातीत जे पात्र आहे ते अॅडल्ट स्टार आहे. हा अॅडल्ट स्टारच महिलांवरील अत्याचार कधी थांबणार अशी विचारणा जाहिरातीत करताना दिसत आहे," अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.
उबाठ्यांच्या दिवट्यांवर बोललं तर अंधारातील सटरफटर चिलटं फडफडतात…
फडफडणारी मशाल विझण्याआधी आपला बुडाखालचा अंधार पाहिला तर अधिक बरे..
आणि उपदेशाच्या उचापती करण्यापेक्षा साधं उत्तर देत का नाही…?तुमच्या जाहिरातीत ‘बाप’च जर पॉर्नस्टार असेल, तर काय करायचे..?
तो पॉर्नस्टार आहे की… pic.twitter.com/G5Ls0Fvqxo— Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar) (@ChitraKWagh) May 2, 2024
"हे लहान वयाच्या मुलींसाह अश्लील चित्रीककरण करतात. हीच व्यक्ती, पात्र उल्लू अॅपवर मुलींसोबत घाणेरडं कृत्य करतानाचे व्हिडीओ, क्लिप्स आहेत. उद्धव ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात कोणती संस्कृती आणण्याचा प्रयत्न करत आहेत. असे बाप जाहिरातीत वापरुन आपण बाप असल्याचं दाखवणार आहोत का? अशी विचारणाी आम्हाला उद्धव ठाकरेंना करायची आहे. ही जाहिरात कोणी तयार केली ती कंपनी आणि या अॅडल्ट स्टारचा संबंध काय?," अशी विचारणा चित्रा वाघ यांनी केली आहे.
भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेतून...#Live #PressConference #BJP #maharashtra @bjp4maharashtra @bjp4india https://t.co/9QSe0GjKqg
— Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar) (@ChitraKWagh) May 2, 2024
पुढे ते म्हणाले की, "ही जाहिरात कंपनी आणि उद्धव ठाकरेंचा काय संबंध? तसंच पब संस्कृतीशी काही संबंध आहे का याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे. केंद्र सरकारने अनेक अश्लील अॅपवर बंदी आणली आहे. आता इतर अॅपवरही कारवाई करावी अशी केंद्राला विनंती आहे. जेणेकरुन उद्धव ठाकरेंना असे अॅडल्ट स्टार सापडणार नाहीत". उद्धव ठाकरे आणि पक्षाकडून पब, पार्टी आणि पॉर्न असा किळसणावा प्रकार सुरु करण्याची भूमिका आहे का याचं त्यांनी महाराष्ट्राला उत्तर दिलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.