close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, स्वाभिमानी संघटनेला एक जागा

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या १२ जणांचा सामावेश आहे. 

Updated: Mar 14, 2019, 04:01 PM IST
राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, स्वाभिमानी संघटनेला एक जागा

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. मावळमधील उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. तसेच पहिल्या यादीत पार्थ पवारचे नाव नाही. बारामतीतून सुप्रिया सुळे, रायगडमधून सुनील तटकरे, कोल्हापुरातून धनंजय महाडिक, साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांच्यासह अन्य नावे जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर केली. आज पार्थ पवार यांचे नाव मात्र जाहीर करण्यात आले नाही. याबाबत जयंत पाटील म्हणालेत, योग्य तेव्हा त्याबाबतचा निर्णय घेऊन योग्य वेळी नाव जाहीर करू. तो निर्णय आमच्या मनाप्रमाणे जाहीर करू द्या, असेही त्यांनी यावेळी मिश्किलपणे म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपण पार्थसाठी माघार घेतल्याचे सांगितले होते. तरीही पहिल्या यादीत पार्थ पवार यांचे नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. दरम्यान, खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कोल्हापुरातील हातकणंगलेची जागा सोडण्यात आली आहे. त्याठिकाणी राष्ट्रवादी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा जाहीर केला आहे.

राष्ट्रवादीचे जाहीर उमेदवार

रायगड - सुनील तटकरे
बारामती - सुप्रिया सुळे
सातारा उदयनराजे भोसले
कोल्हापूर - धनंजय महाडिक
बुलडाणा - डॉ.  राजेंद्र शिंगणे
जळगाव - गुलाबराव देवकर
परभणी - राजेश वीटेकर
मुंबई उत्तर - पूर्व संजय दिना पाटील
ठाणे - आनंद परांजपे
कल्याण - बाबाजी बाळाराम पाटील
लक्षद्वीप - महमंद फैजल