निसर्ग चक्रीवादळ : लांब पल्ल्याच्या 'या' रेल्वे गाड्यांच्या वेळा बदलल्या

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय

Updated: Jun 3, 2020, 03:16 PM IST
निसर्ग चक्रीवादळ : लांब पल्ल्याच्या 'या' रेल्वे गाड्यांच्या वेळा बदलल्या  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : अलिबागच्या किनारपट्टीवर धडकून मुंबईच्या दिशेनं घोंगावणाऱ्या निसर्ग या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येत आहेत. रस्ते वाहतुकीपासून ते हवाई आणि आता रेल्वे वाहतुकीवरही cyclone nisarga निसर्ग चक्रीवादळाची दहशत पाहायला मिळत आहे. 

अतिशय रौद्र स्वरुप धारण करण्याचा धोका पाहता वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील छशिमट अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि एलटीटी म्हणजेच लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या काही लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकांत बदल करण्यात आला आहे. 

 

CycloneNisarg : चक्रीवादळादम्यान प्रवास करताय, हे नक्की वाचा

मुंबईतून सुटणाऱ्या पाच रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. तर, दोन रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असल्याची माहिती भारतीय रेल्वेकडून देण्यात आली. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात काही विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आला होता. त्यातही काही बदल झाल्याची माहिती समोर येत आहे. चक्रीवादळाचा वेग क्षणाक्षणाला वाढत असल्यामुळं रेल्वेकडून ही खबरदारी पाळण्यात येत आहे.