'लव यू जिंदगी' म्हणत लढणाऱ्या ब्रेवगर्लची कोरोना विरुद्ध झुंज अखेर अपयशी

प्रत्येकाळे व्यक्त केली हळहळ 

Updated: May 14, 2021, 10:22 AM IST
'लव यू जिंदगी' म्हणत लढणाऱ्या ब्रेवगर्लची कोरोना विरुद्ध झुंज अखेर अपयशी

मुंबई : जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत आनंदाने जगून घ्या, असं प्रत्येकजण सांगतं. मात्र असं फार कमी लोकांना करायला जमतं. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर 'लव यू जिंदगी' या गाण्याचा कोविड सेंटरमध्ये आनंद घेणाऱ्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. कोरोना काळात परिस्थिती खूप गंभीर असताना हा व्हिडिओ समोर आला होता. मात्र आता या मुलीची कोरोना विरुद्ध झुंज अखेर अपयशी ठरली आहे. 

ट्विटरवर डॉ. मोनिका लांगेहने हॉस्पिटलमधील कोविड इमरजेंसी वॉर्डमध्ये 30 वर्षीय रूग्णाची स्टोरी व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओ खूप दिवस सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमधील तरूणीची सकारात्मकता पाहून सगळ्यांनाच आनंद झाला.

8 मे रोजी मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. मोनिका लांगेह यांनी आयसीयूमध्ये बेड नसल्यामुळे एक मुलगी बाहेर बसली होती. यामुळे ही मुलगी कोविड एमरजेंसी वॉर्डमध्ये ऍडमिट होती. NIV (Non Invasive Ventilation) मध्ये ठेवण्यात होती. यासोबतच रेमडेसिवीर आणि प्लाझ्मा थेरेपी देण्यात आली होती. 

डॉ. मोनिका लांगेह यांनी सांगितलं होतं की,'या मुलीमध्ये दृढ इच्छाशक्ती होती. वॉर्डमध्ये भर्ती झाल्यानंतर तिला मनोबल वाढवण्यासाठी गाणं ऐकते. ती मुलगी शाहरूख खान आणि आलिया भट्टच्या 2016 रोजी प्रदर्शित 'डिअर जिंदगी' सिनेमातील 'लव यू जिंदगी' गाण्यावर मन रमवत होती.