मुंबई : लखनऊच्या प्रियदर्शन यादव मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर अनेक मिम्स सोशल मीडियावर येऊ लागले. 'मुलगी असल्याचा फायदा कसा घ्यायचा? 'याच्या टीप्स या व्हिडीओमध्ये देण्यात आल्या आहेत. हा व्हिडीओ रितिक शहाने या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने तयार केला आहे. (Lucknow Girl Priyadarshani Yadav aka Rexxa, Ritik Shah gave tips how girl assasulting a cab driver and other man ) Rexxa या नावाने रितिकचं इंस्टाग्रामवर अकाऊंट आहे. यावर त्याने हा व्हिडीओ अपलोड केला आहे.
‘लखनऊ मुलीकडून काही टिप्स’ या कॅप्शनसह इन्स्टाग्रामवर पोस्ट झालेला एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यात रितिकने लखऊनच्या प्रियदर्शनी यादव या मुलाचा अभिनय केला आहे. महत्वाची बाब म्हणजे यामध्ये त्याने त्या मुलीसारखेच कपडे घातले आहेत.
हा व्हिडीओ अगदी सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत तुमचं मनोरंजन करेल. मुलगी म्हणून तुम्हाला नेमकं कसं वागायचं? आणि मुलगी म्हणून स्वतःच रक्षण कसं करायचं? यावर या व्हिडीओत भाष्य केलंल आहे.
अनेकदा मुली आपण मुली असल्याचा फायदा घेतात. हीच गोष्ट या व्हिडीओमध्ये अगदी मजेशीर मांडली आहे. तसेच या व्हिडीओने अंजण घालण्याचं काम देखील केलंय. चूक ही चूक असते त्याला लिंग भेदाचं प्रमाण न लावता मान्य करणं गरेजेचे असते.
रितिकचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. आतापर्यंत 1.9 मिलियन लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. या व्हिडीओला मिळणारी पसंती खूप मोठी आहे.