मुंबई : गारपीटग्रस्त शेतक-यांना मदत करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं घेतला. कृषिमंत्री पांडूरंग फुंडकरांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मदतीची घोषणा केली.
फुंडकरांनी दिलेल्या माहितीनुसार १२ तारखेपर्यंत राज्यातल्या १ लाख ८७ हजार हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालंय. अजूनही १३ तारखेच्या नुकसानाची प्राथमिक माहिती प्राप्त झालेली नाही. झालेल्या नुकसानाच्या भरपाईसाठी काही निश्चित भरपाई ठरवण्यात आलीय. मोसंबी आणि संत्र्या उत्पादकांना हेक्टरी २३ हजार ३००, केळी उत्पादकांना हेक्टरी ४० हजार, आंब्याला हेक्टरी ३६ हजार ७०० रुपये भरपाई मिळणार आहे.
विमा नसललेल्या फळबाग शेतक-यांनाही हेक्टरी अठरा हजाराची मदत मिळणार आहे. जिरायती पिकांसाठी हेक्टरी ६ हजार ८०० आणि बागायतीसाठी १३ हजार ५०० रुपयांची भरपाई देण्यात येईल असं कृषी मंत्री फुंडकरांनी स्पष्ट केलंय.