आताची सगळ्यात मोठी राजकीय बातमी, महाविकास आघाडीत बिघाडी?

Maha Vikas Aghadi In disunity after Rajya Sabha elections : राज्यसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. विधानपरिषदेत आपापलं बघा, निर्वाणीचा निरोप शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिल्याची सूत्रांची माहिती आहे.  

Updated: Jun 12, 2022, 02:46 PM IST
आताची सगळ्यात मोठी राजकीय बातमी, महाविकास आघाडीत बिघाडी? title=

कृष्णात पाटील / मुंबई : Maha Vikas Aghadi In disunity after Rajya Sabha elections : राज्यसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. विधानपरिषदेत आपापलं बघा, निर्वाणीचा निरोप शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिल्याची सूत्रांची माहिती आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा सहावा उमेदवार पराभूत झाल्याने हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार उभा केला होता. सहाव्या जागेसाठी कोल्हापुरातील संजय पवार यांना उमेदवारी दिली होती. महाविकास आघाडीकडे मतं असताना शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला. तर भाजपचे धनंजय महाडिक हे विजयी झालेत. त्यामुळे भाजपच्या गोठात कमालीचा उत्साह दिसून येत आहे. त्यांच्याकडे जास्तीच मतं नसताना महाविकास आघाडीतील आमदारांनी मदत केल्याने शिवसेना नाराज आहे. ही नाराजी शिवसेना नेते संजय राऊत यांनी बोलूनही दाखवली.
 
राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला हवी तशी मदत केली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक अपक्ष आमदारांनी भाजपला मतदान करुन शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराला पाडण्यात हातभार लावला. त्यामुळे शिवसेना आता महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादीवर विश्वास ठेवायला तयार नाही. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे काँग्रेसचा दुसरा उमेदवार निवडून आणण्यात मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.