Maharashtra Politics : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना (shivsena) आणि धनुष्यबाण (Dhanushyaban) शिंदे गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या हातातून शिवसेना आणि धनुष्यबाण निसटलं आहे. आता शिवसेना भवन कोणाचं? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ठाकरे-शिंदे गटात (Shinde-Thackeray Group) हमरीतुमरी झाली नाही, असा एक दिवस सहा महिन्यात गेला नाही. मुंबई महापालिकेतील शिवसेना कार्यालयावर शिंदे गटानं दावा ठोकला आणि आता शिंदे शिवसेनाभवन ताब्यात घेणार या चर्चांना उधाण आलंय.
शिवसेना भवनावर शिंदे गटाचा दावा
शिवसेनेनं अनेक बंड पचवली. बाहेरच्यांची आणि घरच्यांचीही पण कधी शिवसेनेच्या अस्तित्वाला धोका पोहचला नाही. शिंदेंच्या बंडानंतर मात्र शिवसेनेच्या अस्तिवालाच नख लागलं. त्यानंतर पहिल्यांदा तीस वर्षांपासून शिवसेनेची ओळख असलेलं धनुष्यबाण चिन्हं गोठवलं गेलं, सोबत शिवसेना हे पक्षाचं नावही गोठवलं गेलं. शिवसेना आमचीच, आम्हीच खरी शिवसेना असा दावा शिंदे गट बंडाच्या पहिल्या दिवसापासून करतोय. त्यात आता शिंदे गट शिवसेनाभवनही ताब्यात घेणार याची चर्चा सुरु झालीय.
दरम्यान बाळासाहेबांनी उभारलेल्या शिवसेना भवनचा इतिहास काय आहे.. पाहुयात..
हे ही वाचा : राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी! धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव एकनाथ शिंदेकडे
शिवसेना भवनाचा इतिहास काय?
शिवसेनेच्या स्थापनेनंतर 8 वर्षांनी म्हणजे 1974 मध्ये पहिल्यांदा शिवसेना भवन उभारलं गेलं. शिवसेना भवन ही शिवाई ट्रस्टची संपत्ती आहे. शिवसेना भवन तयार करताना आर्टिकेटनं किल्ल्यासारखा आकार देण्याचं ठरवलं. खुद्द बाळासाहेब ठाकरे शिवसेना भवनाच्या बांधकामावर लक्ष ठेवून होते. मीनाताई ठाकरेंच्या इच्छेनुसार शिवसेना भवनात आंबेमातेचं मंदिर उभारण्यात आलं. महाराष्ट्रात कुठल्याही राजकीय पक्षाचं इतकं भव्य पक्ष कार्यालय नाही. वर्गणीच्या माध्यमातून शिवसेना भवन उभं राहिलं आहे.
हे ही वाचा : शिवसेना आणि धनुष्यबाण बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
कुणाच्या स्वप्नातही आल्या नसतील अशा घटना शिंदेंच्या बंडानंतर घडल्या. त्यात शिवसैनिकांसाठी मंदिरासमान असणारं शिवसेना भवन शिंदे गट ताब्यात घेईल, असा दावा करण्यात आलाय. याला उत्तर देताना शिवसेना भवनावर दावा करायला मोगलाई आहे का? असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.