रावसाहेब दानवे यांना हवाय ब्राह्मण मुख्यमंत्री, अजित पवार म्हणतात तृतीयपंथीही...

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्यावर आता राजकीय पडसाद उमटू लागले आहेत.

Updated: May 5, 2022, 03:33 PM IST
रावसाहेब दानवे यांना हवाय ब्राह्मण मुख्यमंत्री, अजित पवार म्हणतात तृतीयपंथीही...  title=

Maharashtra Politics : भाजपाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. राज्यात ब्राह्मण मुख्यमंत्री झाल्याचं पाहू इच्छितो असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. जालन्यात परशुराम जयंतीच्या कार्यक्रमात बोलताना दानवेंनी हे वक्तव्य केलं आहे. 

रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि शिवसेने नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी दानवे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

नेमकं काय म्हणाले दानवे
ब्राह्मणाला केवळ मी नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पाहू इच्छित नाही तर ब्राह्मणाला या राज्याचा मुख्यमंत्री पाहू इच्छितो, असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका आल्याने आमच्याकडे लक्ष ठेवा. वेगवेगळ्या ठिकाणी ब्राह्मणांना प्रतिनिधित्व द्या. एकापेक्षा जास्त ब्राह्मण जालना महापालिकेमध्ये निवडणून द्या असं आवाहनी दानवे यांनी केलं.

अर्जुन खोतकर यांचं उत्तर
या कार्यक्रमात दानवे यांच्या भाषणाला प्रत्युत्तर देताना शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी सध्या राज्याचे मुख्यमंत्री ब्राह्मणच असल्याची आठवण करुन दिली.  सध्याचे मुख्यमंत्री परशुरामच आहे, याआधी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे सुद्धा परशुरामच होते, त्यामुळे त्यामुळ करु वैगरे या भानगडी सोडून द्या' असा टोला अर्जुन खोतकर यांनी लगावला.

'तर कोणीही मुख्यमंत्री होऊ शकतो'
रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोला लगावला आहे. 'मुख्यमंत्री कोणत्या जातीच्या व्यक्तीने व्हावं असं म्हणणं योग्य नाही, तो कोणीही होऊ शकतो, तृतीयपंथी पण होऊ शकतो, किंवा कोणत्याही जातीधर्माची व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकते. 145 चं बहुमत आणा आणि राज्याचे प्रमुख व्हा, असं कोणी सांगेल की अमुक याने व्हावं, असं म्हणणं चुकीचं असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.