NCP (SP) Second List : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसेच्या NCP (SP) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दुसऱ्या यादीत 22 नावांची घोषणा केली आहे. दुसऱ्या यादीत उल्हासनगरमधून ओमी कलाणी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर माळशिरसमधून उत्तम जानकर, सिन्नरमधून उदय सांगळे, आरवीमधून मयुरी काळे, येवल्यातून माणिकराव शिंदे, दिंडोरीतून सुनीता चारोसकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 67 नावांची नावं राष्ट्रवादीने जाहीर केली आहे. उमेदवारांची तिसरी यादी रविवारी जाहीर केली जाणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी
1. एरंडोल - सतीश अण्णा पाटील
2. गंगापूर - सतीश चव्हाण
3. शहापूर - पांडुरंग बरोरा
4. परांडा - राहुल मोटे
5. बीड - संदीप क्षीरसागर
6. आर्वी - मयुरा काळे
7. बागलान - दीपिका चव्हाण
8. येवला - माणिकराव शिंदे
9. सिन्नर - उदय सांगळे
10. दिंडोरी - सुनीता चारोस्कर
11. नाशिक पूर्व - गणेश गीते
12. उल्हासनगर - ओमी कलानी
13. जुन्नर - सत्यशील शेरकर
14. पिंपरी - सुलक्षणा शीलवंत
15. खडकवासला - सचिन दोडके
16. पर्वती - अश्विनीताई कदम
17. अकोले - अमित भांगरे
18. अहिल्या नगर शहर -अभिषेक कळमकर
19. माळशिरस - उत्तमराव जानकर
20. फलटण - दीपक चव्हाण
21. चंदगड - नंदिनीताई भाबुळकर कुपेकर
22. इचलकरंजी - मदन कारंडे
आप प्रचार करणार
दरम्यान, आपकडून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रचार केला जाणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मविआ उमेवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार आहेत. आप नेते संजय सिह यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.