मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Assembly Budget 2021) आज विधीमंडळात मांडण्यात येणार आहे. कोरोना (Corona) , लॉकडाऊन (Lockdown) च्या पार्श्वभूमीवर बजेटकडून सामान्यांच्या भरपूर अपेक्षा आहेत. पेट्रोल-डिझेलमध्ये (Petrol, Diesel Price) सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का याकडे देखील साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. अर्थसंकल्प अधिवेशनाचं आजपासून दुसरं सत्र सुरू झालं असून 8 एप्रिलपर्यंत चालणार अधिवेशन. खासदारांसाठी खास संसद भवन मेडिकल सेंटरमध्ये लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
महाविकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात दुपारी 2 वाजता मांडला जाणार आहे. अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प विधानसभेत तर राज्यमंत्री शंभूराजे देसाई विधानपरिषदमध्ये अर्थसंकल्प मांडतील. कोरोनाची साथ आणि लॉकडाऊन यामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. राज्यावरील कर्जाचा भार 5 लाख कोटींच्या घरात पोहचलाय. अशा वेळी अर्थसंकल्पात काय तरतुदी केल्या जातात याची उत्सुकता आहे.
विशेषतः मराठवाडा आणि विदर्भाच्या विकास महामंडळाची मुदत संपली असतांना अर्थमंत्री काय घोषणा करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. इंधनावरील राज्याचा कर कमी करून अर्थमंत्री सर्वसामान्यांना दिलासा देतात का, याकडेही लक्ष लागलं आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरू होत आहे. दुसरं सत्र ८ मार्चपासून सुरू होऊन ८ एप्रिलला संपणार आहे. संसदेत कोरोनासंबंधी नियमांसोबतच संसदेत खासदारांसाठी लसीकरणही सुरू होत आहे. ९ मार्चपासून संसदेत खासदारांसाठी लसीकरण मोहिम सुरू होत आहे. ६० वर्षांवरील खासदार या लसीकरण मोहिमेसाठी पात्र असणार आहेत. तसंच व्याधी असलेले४५ वर्षांवरील खासदारही लसीकरण मोहिमेसाठी पात्र असणार आहेत. आजपासून राज्यसभा सकाळी ९ ते दुपारी २ तर लोकसभा संध्याकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत कामकाज करेल.