बेळगाव सीमाप्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बेळगाव सीमाप्रश्नावर येत्या शनिवारी मुंबईमधील सह्याद्री अतिथीगृहात महत्वाची बैठक बोलावली आहे. 

Updated: Dec 5, 2019, 07:07 PM IST
बेळगाव सीमाप्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार बैठक title=
संग्रहित छाया

मुंबई : आता एक बातमी बेळगावमधील सीमावासीय बांधवांना दिलासा देणारी. अनेक वर्षांपासून बेळगावचा सीमावाद प्रश्न कायम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बेळगाव सीमाप्रश्नावर येत्या शनिवारी मुंबईमधील सह्याद्री अतिथीगृहात महत्वाची बैठक बोलावली आहे. 

यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि इतर नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारीही बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सीमाप्रश्‍नी बैठक बोलाविल्याने सीमावासियांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

रखडलेला सीमाप्रश्नावर मुख्यमंत्री ठाकरे ठोस निर्णय घेतली, अशी अपेक्षा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना आहे. दरम्यानस विधिमंडलाच्या विशेष अधिवेशनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या भाषणात कर्नाटकातील मराठी भाषिक ८६५ गावातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध असेल, असे सांगितले होते.

चार दिवसांपूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून मुख्यमंत्री ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना पत्र पाठवून उच्चाधिकार समितीची पुनर्रचना करावी, सीमाप्रश्नी समन्वयक मंत्र्यांची नेमणूक करावी, दिल्लीतील वकिशांशी चर्चा करावी आदी मागण्यात केल्या होत्या. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही बैठक बोलावली आहे.