महाविकास आघाडी सरकारला राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्याची फडणवीस यांची मागणी

Maharashtra politics crisis: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.  

Updated: Jun 29, 2022, 07:49 AM IST
महाविकास आघाडी सरकारला राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्याची फडणवीस यांची मागणी  title=

मुंबई : Maharashtra politics crisis: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. आता राज्यपालांच्या निर्णयाकडं लक्ष लागले आहे. ( Devendra Fadnavis meets Governor, demands MVA govt take immediate floor test)

राज्यातल्या सत्तासंघर्षाबाबत भाजप नेत्यांनी अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतली. या भेटीत त्यांनी ठाकरे सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला. त्यामुळे ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, असं विनंती पत्र दिल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

राज्यपाल योग्य निर्णय घेतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. फडणवीसांनी दुपारीच दिल्लीत जाऊन अमित शाह आणि जे पी नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतर फडणवीस दिल्लीहून मुंबईत आल्यानंतर थेट इतर भाजप नेत्यांना सोबत घेऊन राजभवनावर गेले. 

भाजपने बहुमत सिद्ध करण्याची मागणी केल्यावर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील अशी शक्यता आहे. सूत्रांनी ही माहिती दिली. बहुमत सिद्ध करण्याबाबत उद्धव ठाकरेंशी राज्यपाल चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्यांची आज तात्काळ बैठक बोलावण्यात आली आहे. सध्याच्या राजकीय पेचप्रसंगासंबंधी कोर्टात जायचं किंवा पुढे आणखी काय रणनीती आखायची याची खलबतं मविआच्या बैठकीत होणार आहेत.