कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना सोमवारी मृत्यू सर्वात कमी

समाधानकारक बाब समोर आली 

Updated: Feb 24, 2021, 08:18 AM IST
कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना सोमवारी मृत्यू सर्वात कमी  title=

मुंबई : एकीकडे कोरोना वाढत (Coronavirus) असताना राज्यात सोमवारी सर्वात कमी (death Count lowest) मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या २ आठवड्यात सर्वात कमी मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच रूग्ण बरे होण्याचं प्रमाणही समाधानकारक असल्याचं सांगण्यात येत आहे. एकीकडे कोरोनाचे रूग्ण वाढत (Maharashtra Corona patients) असताना गेल्या दोन आठवड्यातले सर्वात कमी मृत्यू हे या सोमवारी होते. सोमवारी राज्यात 18 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सोमवारी ५ हजार 210 कोरोना रूग्ण आढळले. सातत्याने सहा हजारांपुढे रूग्णसंख्या जात असताना हा आकडा समाधानकारक आहे. 

तसेच यवतमाळमध्ये गेल्या आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यासाठी नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन न केल्यास लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नसल्याचं यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितलं आहे. येत्या दोन दिवसांत जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासन लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.  

देशातल्या पाच कोरोना स्ट्रेनपैकी दोन स्ट्रेन महाराष्ट्रात सापडले आहेत. पण नव्या स्ट्रेनमुळे कोरोना वाढल्याची शक्यता आरोग्य सचिवांनी फेटाळली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 6218 नवे रुग्ण, तर 51 जणांचा मृत्यू झाला आहे.  भारतात कोरोनाचे नवे पाच स्ट्रेन आढळून आले आहेत. यातले दोन नवे स्ट्रेन महाराष्ट्रात आढळून आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. केंद्र सरकारनं कोरोना विषाणूच्या संशोधनासाठी एक समिती बनवली होती.

त्या समितीनं अहवाल दिला असून त्यातून हे नवे पाच स्ट्रेन आढळून आले आहेत. पहिला इंग्लंडमधील स्ट्रेन आहे. तर दुसरा दक्षिण आफ्रिकेतील नवा स्ट्रेन भारतात आलाय. तिसरा स्ट्रेन ब्राझिलमधला असून चौथा आणि पाचवा स्ट्रेन महाराष्ट्रात आढळून आलाय. मात्र या नव्या स्ट्रेनमुळे कोरोनाचा फैलाव होत असल्याची शक्यता आरोग्य मंत्रालयानं फेटाळून लावली आहे.