प्रशांत अंकुशराव, झी २४ तास, मुंबई : लॉकडाऊनमुळं सगळ्यांचा सोशल मीडियावरील वावर वाढलाय आणि अर्थातच त्यामुळं सायबर गुन्हे देखील वाढलेत. सेक्सच्या भुलभुलैय्यात अडकवून ब्लॅकमेलिंगचे प्रकार देखील वाढले आहेत. तुम्ही देखील अशाच एखाद्या मोहजालात अडकू शकता. (sextortion racket)
तुम्हाला सोशल मीडियावर अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट आलीय? तुमच्या मोबाईलवर अनोळखी व्हिडिओ कॉल येतोय...? मग सावधान... तुमचंही 'सेक्सटॉर्शन' होऊ शकतं.
सेक्सटॉर्शन म्हणजे सेक्सचं आमीष दाखवून केलं जाणारं एक्स्टॉर्शन. अर्थात सेक्सच्या आमिषानं होणारी आर्थिक फसवणूक. अनेक व्हीआयपी मंडळी अलिकडच्या काळात सेक्सटॉर्शनच्या शिकार झाल्या आहेत.
असं केलं जातं सेक्सटॉर्शन (sextortion)
१) सेक्सटॉर्शन करणारे आरोपी व्हीआयपी लोकांना सोशल मीडियावर टार्गेट करतात.
२) एखाद्या सुंदर मुलीचा फोटो प्रोफाईलला लावून बनावट अकाऊंट ओपन केलं जातं. (social media profiles)
३) ती फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केल्यावर एखाद्या दिवशी व्हिडिओ कॉल येतो. (friend request)
४) तो फोन कॉल उचलताच पॉर्न क्लिप दाखवल्या जातात
५) ती व्यक्ती पॉर्न व्हिडिओ पाहत बसली की ते रेकॉर्ड केलं जातं. आणि मग त्या भांडवलावर सुरू होते ती खंडणीची मागणी... extoration
६) रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी सेक्सटॉर्शन करणारे देतात. (blackmail)
अशाच एका सेक्सटॉर्शन रॅकेटचा मुंबई क्राईम (Mumbai police) ब्रँचच्या सायबर सेलनं (cyber cell) छडा लावलाय. याप्रकरणी राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून तिघा आरोपींना पकडण्यात आलं आहे
या प्रकरणात पूजा शर्मा नावानं तब्बल 151 बनावट अकाऊंट्स (fake accounts) तयार करण्यात आली होती, अशी माहिती चौकशीत समोर आलीय. ही अकाऊंट्स सायबर सेलनं बंद केलीत. काही टेलिग्राम चॅनल्सवरही बंदी घालण्यात आली आहे.
सेक्सटॉर्शन करणाऱ्या या टोळीनं सध्या तरी काही राजकारणी, उद्योजक आणि मीडियातल्या बड्या लोकांना टार्गेट केलं होतं... पण अशाचप्रकारे तुमची देखील फसवणूक होऊ शकते.. तेव्हा सावधान इंडिया सावधान...