राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, ओबीसी आरक्षण मुद्दा वादळी ठरणार

Mahavikas Aghadi government : राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक होत आहे.  

Updated: Dec 8, 2021, 10:32 AM IST
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, ओबीसी आरक्षण मुद्दा वादळी ठरणार
संग्रहित छाया

मुंबई : Mahavikas Aghadi government : राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक होत आहे. (Maharashtra Government cabinet meeting) या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याच्या निर्णयावरही पुनर्विचार होणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केल्याने राज्य सरकारसमोर अडचण निर्माण झाली आहे. यातून कसा मार्ग काढायचा याबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याबाबत निवडणूक आयोगाला विनंती करण्यासंदर्भातही या बैठकीत चर्चा होऊ शकते. 

एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देऊनही अद्याप हजारो कर्मचारी संपावर आहेत. त्यांच्याविरोधात मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत होऊ शकतो. याशिवाय राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळू लागल्याने नवे निर्बंध लावायचे का याबाबत बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. तसेच ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचा आढावाही या बैठकीत घेतला जाऊ शकतो.