राज्यातील ३६ हजार रिक्त पदांसाठी, या तारखेला निघणार जाहिरात

ज्यातील तरूणांना मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी देखील मिळणार

Updated: Jul 5, 2018, 12:44 AM IST
राज्यातील ३६ हजार रिक्त पदांसाठी, या तारखेला निघणार जाहिरात title=

मुंबई : राज्यातील बेरोजगार तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण शासनाने विविध विभागातील शासकीय, तसेच निमशासकीय कार्यालयात रिक्त पदं भरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील तरूणांना मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी देखील मिळणार आहे. महिन्याभरात नोकरभरतीच्या जाहिराती झळकणार आहेत. राज्यात ३६ हजार पदांची भरती केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या सेवेतील एकूण रिक्त जागांपैकी ७२ हजार पदे भरण्याची घोषणा, मार्च-एप्रिलमध्ये पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. या घोषणेनुसार पहिल्या टप्प्यात ३६ हजार पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्‍यातील सर्व विभागांना रिक्‍त पदाची माहिती १७ जुलैपर्यंत देण्‍याचे निर्देश राज्‍य सरकारने दिले आहे. त्‍यानंतर ३१ जुलैला पदांची जाहिरात निघणार आहे. ऑगस्‍ट महिन्यात जिल्‍हा निवड समित्‍यांच्‍या समन्‍वयातून, एकाच दिवशी परीक्षा घेण्‍यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

 सरकारी नोकरी खालील विभागात

१) ग्रामविकास विभाग - ११ हजार ५ पदे
२) सार्वजनिक आरोग्य विभाग- १० हजार ५६८ पदे
३) गृह विभाग- ७ हजार १११ पदे
४) कृषी विभाग- २ हजार ५७२ पदे
५) पशुसंवर्धन विभाग- १ हजार ४७ पदे
६) सार्वजनिक बांधकाम विभाग- ८३७ पदे
७) जलसंपदा विभाग- ८२७ पदे
८) जलसंधारण विभाग- ४२३ पदे
९) मत्स्यव्यवसाय विकास विभाग- ९०
१०) नगरविकास विभाग- १ हजार ६६४ पदे