Mumbai Suburban Railway | मुंबईतील कोरोनाचा वाढत्या रुग्णसंख्येमुळे लोकल बंद होणार?

मुंबईसह राज्यात दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित (Corona) सापडत आहेत. त्याच्या जोडीला ओमायक्रॉन (Omicrone) रुग्णांचा दैनंदिन आकडाही शंभरीपार जात आहे. 

Updated: Jan 6, 2022, 06:23 PM IST
Mumbai Suburban Railway | मुंबईतील कोरोनाचा वाढत्या रुग्णसंख्येमुळे लोकल बंद होणार? title=

मुंबई : मुंबईसह राज्यात दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित (Corona) सापडत आहेत. त्याच्या जोडीला ओमायक्रॉन (Omicrone) रुग्णांचा दैनंदिन आकडाही शंभरीपार जात आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा (Health System) सतर्क झाली आहे. तसेच पुढे येत्या काळात हा आकडा आणखी वाढू नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. दरम्यान वाढत्या रुग्णसंख्येमुळे लोकल रेल्वे (Local Railway) आणि लॉकडाऊनबाबत (Lockdown) आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी माहिती दिली आहे. (maharashtra health minister rajesh tope reaction on local railway and lockdown)

कोरोनामुळे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत सर्वसामांन्यांना लोकल रेल्वे प्रवासाची परवानगी नव्हती. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच रेल्वे प्रवासाची मुभा होती. त्यानंतर कोरोनाचा ओसरता जोर पाहता अटी शर्थींसह सर्वसामांन्याना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात आली.   

दरम्यान आता मुंबईत पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. रेल्वेतून मोठ्या प्रमाणात अनेक जण प्रवास करतात. त्यामुळे रेल्वेत कोरोनाचा वेगाने प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लोकल रेल्वे बंद होणार की नाही, याबाबत टोपेंनी माहिती दिली आहे. 

लोकल रेल्वे बंद होणार? 

"मुंबई लोकल रेल्वे बंद करण्याबाबत सध्या कोणताही विचार नाही", असं टोपे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे सर्वसामातसंच जिल्हाबंदी करण्याचा विचार तूर्त नाही, असंही आरोग्यमंत्री म्हणाले. 

लॉकडाऊनबाबत काय म्हणाले?

" राज्यात सध्या लॉकडाऊनबाबत विषय अजिबात नाही. राज्यात निर्बंधामध्ये वाढ करायची की नाही, हे मुख्यमंत्र्यांच्या विचारविनिमयानंतर ठरेल", अशी प्रतिक्रिया टोपे यांनी लॉकडाऊनच्या शक्यतेवर दिली.