Anil Parab ED: अनिल परब यांना ED चा जबरदस्त झटका; 10 कोटी 20 लाखांची प्रॉपर्टी जप्त

अनिल परबांशी संबंधित संपत्ती ईडीनं जप्त केली आहे. 10 कोटी 20 लाखांची ही संपत्ती असून अनिल परब, साई रिसॉर्ट आणि इतरांशी संबंधित असलेल्या मनी लॉड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ईडीनं ट्विट करून ही माहिती दिलीय. 

Updated: Jan 4, 2023, 04:37 PM IST
Anil Parab ED: अनिल परब यांना ED चा  जबरदस्त झटका; 10 कोटी 20 लाखांची प्रॉपर्टी जप्त title=

Anil Parab ED: ठाकरे गटाचे माजी मंत्री  शिवसेना नेते  अनिल परब (Anil Parab)  यांना ईडीने जबरदस्त झटका दिला आहे. अनिल परब यांच्या ; 10 कोटी 20 लाखांच्या मालमत्तेवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे.  दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी(Sai Resort in Dapoli) अनिल परब यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेली मालमत्ता ही साई रिसॉर्टशी संबधीत असल्याचे समजते. या प्रकरणी ईडीकडून अनिल परब यांनी अनेकदा चौकशी झाली होती. तसेच  साई रिसॉर्टप्रकरणी ईडीनं सात  ठिकाणी छापेमारी देखील केली होती. भाजप नेते किरीट सोमय्या(BJP leader Kirit Somaiya) यांनी साई रिसॉर्टप्रकरण लावून धरले होते. त्यांनीच हे प्रकरण बाहेर काढले होते. साई रिसोर्ट पाडण्याच्या मागणीसाठी सोमय्या यांनी अनेकदा आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच ते जोपोलीत देखील गेले होते.  

अनिल परबांशी संबंधित संपत्ती ईडीनं जप्त केली आहे. 10 कोटी 20 लाखांची ही संपत्ती असून अनिल परब, साई रिसॉर्ट आणि इतरांशी संबंधित असलेल्या मनी लॉड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ईडीनं ट्विट करून ही माहिती दिलीय. 

 

 

किरीट सोमय्या बाहेर काढला होता घोटाळा

दापोली येथील साई रिसॉर्टच्या खरेदी-विक्री व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. अनिल परब यांनी 2018 च्या विधान परिषद निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात रिसॉर्टचा उल्लेख केला होता. या रिसॉर्टची घरपट्टीही भरण्यात आली होती, असा दावा सोमय्या यांनी दाखल केला होता. किरीट सोमय्या यांचे सर्व आरोप अनिल परब यांनी फेटाळून लावले होते.  साई रिसॉर्टशी संबंध नसल्याचा दावा अनिल परब यांनी केला होता. मात्र, सोमय्या यांनी पाठपुरावा सुरुच ठेवला होता. मे 2022 मध्ये  साई रिसॉर्टप्रकरणी ईडीनं अनिल परब यांच्याशी संबधित सात ठिकाणी छापेमारी केली होती. तसेच अनिल परब यांची 13 तास चौकशी करण्यात आली होती. दरम्यान, साई रिसॉर्ट पाडावा यामगाणीसाठी किरीट सोमय्या आक्रमक आहेत. साई रिसॉर्टवर तोडक कारवाई कधी करणार असा सवाल सोमय्या सातत्याने उपस्थित करत आहे.