कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई : राज्याच्या राजकारणातून (Maharashtra Politics) मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीत दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. (maharashtra politcs important meeting between cm eknath shinde and dcm devendra fadnavis)
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आजच राज्यपाल यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर लगेचच मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. जवळपास 40 मिनिटांपासून ही बैठक सुरु असल्याचं म्हटलं जातंय. या भेटीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जाते विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकरणाविषयी देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.
शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार मोठ्या प्रतिक्षेनंतर पार पडला. राज्य सरकारचा 9 ऑगस्टला पहिल्यांदा विस्तार झाला. यामध्ये एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर दिवाळीनंतर राज्य सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा होती. मात्र दिवाळीनंतरचा मुहूर्तही हुकला. अनेक आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग लावून बसलेत. यामुळे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातील बैठकीत नक्की काय ठरतं, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.