Maharashtra : आम्हालाही पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता आणायची आहे, पण.. - संजय राऊत

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता आणायची आहे, असे संजय राऊत म्हणाले.  

Updated: Jul 29, 2022, 01:51 PM IST
Maharashtra : आम्हालाही पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता आणायची आहे, पण.. - संजय राऊत  title=

मुंबई : Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता आणायची आहे, पण लोकशाही मार्गाने, असे स्पष्टच शिवेसना खासदार संजय राऊत म्हणाले. ज्येष्ठ नेते लिलाधर डाके, मनोहर जोशी हे कडवे शिवसैनिक आहेत. अनेक वादळांमध्ये त्यांनी शिवसेनेची साथ दिली आहे. ज्येष्ठ नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांनी निष्ठा शिकावी, असा टोलाही यावेळी राऊत यांनी हाणला.

शिंदे कोणत्या पक्षाच्या नियुक्त्या करतायत, असा सवाल उपस्थित केला. शिंदेंनी दुसरा पक्ष स्थापन करुन अस्तित्व दाखवावं, असे आव्हान देताना राऊत म्हणाले, राज्यात पोरखेळ सुरु आहे. आम्हालाही सत्ता आणायची आहे, पण लोकशाही मार्गाने. आपण  सत्तांतराच्या वक्तव्यावर आजही ठाम आहोत, असे ते म्हणाले.

प्रत्येकाचे एक स्वप्न असते. कुणाला मिळेल त्या मार्गाने मुख्यमंत्री व्हायचे असते. आम्हाला महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता आणायची आहे. पण मिळेल त्या मार्गाने नाही, लोकांकडून लोकशाही मार्गाने सत्ता आणू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री राज्याचा दौरा करत आहेत ही चांगली गोष्ट आहे. दिल्लीच्या वाऱ्या वाढल्या आहेत. यातून वेळ काढून मुख्यमंत्री राज्यात फिरणार असतील तर यावर टीका करण्यासारखे काही नाही, असे संजय राऊत म्हणाले. राज्यात पावसाने मोठे नुकसान झाले आहे. विरोधी पक्षनेते दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रात अजून मंत्रिमंडळ स्थापन झालेले नाही, याकडे त्यांनी बोट दाखवले.