हिवाळी अधिवेशनात भाजप आक्रमक, सरकारने विरोधी पक्षनेत्यांची ही सूचना स्वीकारली

Maharashtra Winter Session : हिवाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. दरम्यान, विरोधकांनी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. 

Updated: Dec 22, 2021, 02:05 PM IST
हिवाळी अधिवेशनात भाजप आक्रमक, सरकारने विरोधी पक्षनेत्यांची ही सूचना स्वीकारली  title=

मुंबई : Maharashtra Winter Session : हिवाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. दरम्यान, विरोधकांनी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तसेच विरोधकांना रोखण्यासाठी सरकारची रणनीती ठरली आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाविकासआघाडीच्या आमदारांची बैठक घेतली. (Maharashtra Winter Session - In the winter session, the BJP aggressively)

महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक बैठक घेतली. विधान भवनात महाविकास आघाडी सरकारचे मंत्री महोदय आणि विधीमंडळ सदस्यांच्या बैठकीत अजित पवार यांनी सभागृहाच्या कामकाजाबद्दल चर्चा केली आणि सूचना दिल्या.

 देवेंद्र फडणवीस आक्रमक

विधिमंडळाचे कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळालेत. यावेळी विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात खडाजंगी झाली. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केवळ शोकप्रस्ताव होतो. मी आग्रह केला शोकप्रस्तावाबरोबर केवळ प्रश्नोत्तरे आणि लक्षवेधी ठेवा. पण आज सरकार 12 विधेयके मांडणार आहे, ते करू नये, असे देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आज कामकाज पत्रिकेत जे कामकाज आहे ते घ्यावे. विधेयके घेऊ नयेत ही बाब आम्हाला मान्य आहे, असे सांगत कामकाजात विरोधकांचा होणार अडथळा पार केला. विधेयके घेऊ नयेत ही बाब आम्हाला मान्य आहे, असं उपमुख्यमंत्र्यांनी म्हणत विरोधी पक्षनेत्यांची सूचना स्विकारली. ( Maharashtra Government accepted the suggestion of Opposition Leader)

मुख्यमंत्री अधिवेशनाला उपस्थित राहणार का?

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांची तब्येत एकदम बरी आहे. त्यांना य़ोग्य वाटेल तेव्हा ते कामकाजात उपस्थित राहतील अशी माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.