मुंबई : राजकारणातील प्रत्येक व्यक्तीने जबाबदारपणे वक्तव्य करणे गरजेचे आहे. विरोधी पक्षातील नेते याआधी सत्तेत होते. त्यामुळे त्यांनी बोलण्याआधी जबाबदारपणे वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे. केवळ राजीनामा मागणे हेच विरोधकांचे काम दिसून येत आहे. कितीही आरोप केले तरी महाविकासआघाडी सरकार (Maha vikas Aghadi Government) भक्कम आहे, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरील आरोपनंतर त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनाही अभय देणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. पवारांच्या मुंबईतल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी राऊतांनी सहकुटुंब पवारांची भेट घेतली. विरोधकांनी कितीही आरोप केले तरी महाविकासआघाडी सरकार भक्कम असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
तसेच राजीनामा घेतला पाहिजे हा विरोधकांचा एक ज्वलंत मंत्र असतो. काहीही झाल्यास ते राजीनामा घ्या, असेच म्हणतात. मात्र असं असल्यास आम्ही दररोज पंतप्रधानांचा राजीनामा मागू. दिल्लीत आंदोलन राजीनामा मागण्यासारखंच आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. तसेच प्रत्येक आरोपाला उत्तर देणे घटनेत लिहिलेले नसल्याचेही ते यावेळी म्हणालेत.