मालाडमध्ये झोपडपट्टीला भीषण आग

खरोडी तलावाजवळ असलेल्या तीन ते चार झोपड्यांना दुपारी आग लागली. 

Updated: Dec 9, 2018, 05:46 PM IST
मालाडमध्ये झोपडपट्टीला भीषण आग title=

मुंबई: मालाड येथील मालवणी परिसरात रविवारी दुपारी झोपडपट्टीला भीषण आग लागल्याची घटना घडली. दुपारी सव्वातीनच्या सुमारास ही आग लागली होती. यानंतर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 
  

येथील खरोडी तलावाजवळ असलेल्या तीन ते चार झोपड्यांना दुपारी आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवळपास दीड तासानंतर ही आग आटोक्यात आली. मात्र, या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.