बोरीवलीत मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

घटनेनंतर परिसरात एकच खळबळ 

Updated: Jun 29, 2018, 04:34 PM IST
बोरीवलीत मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू title=

मुंबई : बोरीवलीत मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. बोरावली पश्चिम येथील वीर सावरकर गार्डन येथील ही काल दुपारची घटना आहे. पंकज शहा या ५४ वर्षीय व्यक्तीचा मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. खासदार गोपाळ शेट्टी यांच्या संस्थेच्या ताब्यात हे गार्डन असल्याचे पालिकेच्या उद्यान अधिका-यांनी माहिती दिली आहे. घटनेनंतर आज गार्डनमधील मधमाशाचे पोळे काढण्यात आले आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ आहे.