मुंबई : मनोरा आमदार निवासात दुरूस्तीची कामं न करताच अधिकार्यांनी आणि कंत्राटदारांनी लाखो रूपयांची बिलं काढल्याचा घोटाळा आज विधानसभेत गाजला. झी मीडीयानं हा सगळा गैरकारभार उघडकीस आणला होता.
यावरून आमदार चरण वाघमारे आणि विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी आमदारांची समिती नेमण्याची मागणी त्यांनी केली. तर घोटाळे करणा-या अधिका-यावंर गुन्हा दाखल सरकारनं गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चरण वाघमारे यांनी केली.
याप्रकरणी दोघा उप अभियंत्यांना निलंबित करण्यात आलंय, तर एका कार्यकारी अभियंत्याची बदली करण्यात आलीय. या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात येईल, असं आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं.