मुंबई : गिरीष महाजन यांच्या मध्यस्थीनंतर अखेर 16 दिवसानंतर सकल मराठा क्रांती मोर्चाने उपोषण मागे घेतलं आहे. सकल मराठा क्रांती मोर्चाचा आझाद मैदानातील आमरण उपोषणाचा आजचा १६वा दिवस होता. याआधी आज विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील आज आझाद मैदानात उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली. 10 दिवसाच्य़ा आत निर्णय घ्या अन्यथा पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'आता आंदोलन करू नका, १ डिसेंबरला जल्लोष करा'; असे वक्तव्य केलं होतं. यावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका करत म्हटलं की, मुख्यमंत्र्यांनी सभागृहाचा हक्कभंग केला आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार आहोत'.