मराठी अभिनेत्रीची रस्त्यावर छेडछाड, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

एका ३८ वर्षीय मराठी चित्रपट अभिनेत्रीची भररस्त्यात छेडछाड करण्यात आली तसेच तिच्यावर हल्ल्याचाही प्रयत्न झाला

Updated: Mar 1, 2021, 09:12 PM IST
मराठी अभिनेत्रीची रस्त्यावर छेडछाड, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मुंबई:  एका ३८ वर्षीय मराठी चित्रपट अभिनेत्रीची भररस्त्यात छेडछाड करण्यात आली असून तिच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. अभिनेत्रीने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी काही तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. वाहनचालकाला पोलिसांनी महिलेशी छेडछाड, तसेच हल्ला करणे आणि Drunk and Drive च्या आरोपाखाली अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठी अभिनेत्री शुक्रवारी तिच्या लहान मुलांबरोबर गाडीने बाहेर निघाली होती. आरोपीही त्याच्या कुटुंबासोबत गाडीमधून प्रवास करत होता, तेव्हा दोन्ही गाड्या समोरासमोर एका अरुंद जागेत येवून थांबल्या, तेव्हा आरोपी आणि अभिनेत्रीने यांच्यात गाडी मागे घेण्यावरुन वाद सुरु झाला. 

अभिनेत्रीने गाडीतून उतरुन आरोपीला गाडी मागे घेण्यासाठी सांगितले. पण त्याने अभिनेत्रीला अर्वाच्य भाषेत उत्तर दिलं आणि तिचा हात पकडला. आरोपी हा माजी बीपीओ कर्मचारी आहे. आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.