मुंबईकरांनो, रेल्वेच्या तिनही मार्गांवर आज मेगाब्लॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळांची देखभाल, दुरुस्ती आणि इतर कामांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Updated: Sep 24, 2017, 08:45 AM IST
 title=

मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळांची देखभाल, दुरुस्ती आणि इतर कामांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

सकाळी १०.३५ ते दुपारी ३.४५ पर्यंत पश्चिम रेल्वेवर अंधेरी बोरीवली दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे या काळातील वाहतूक अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. 

मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण दरम्यान सकाळी १०.४८ ते दुपारी ४.२३ पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. या काळात वाहतूक डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. यामुळे ब्लॉक काळात मुंब्रा, कोपर, ठाकुर्ली या स्थानकात लोकल थांबणार नाहीत. प्रवाशांच्या सोयीसाठी दिवा, डोंबिवली, कल्याण मार्गे अप प्रवास करण्याची मुभा रेल्वे प्रशासनाने दिलीय. सकाळी ११ ते ५ या काळात मध्य रेल्वेवरील लोकल १० मिनिटे उशिराने धावतील. 

हार्बर मार्गावरहील अप आणि डाऊन मार्गावर ११.२० ते ४.२० या काळात मेगाब्लॉक असेल. या काळात नेरुळ - पनवेल / बेलापूर मार्गावरील सेवा खंडीत करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी - नेरुळ आणि ठाणे - नेरुळ या मार्गावर विशेष फेऱ्या चालवण्यात येतील.