मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

दुरुस्तीसह तांत्रिक कामासाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आलाय..

Updated: Jun 4, 2017, 09:26 AM IST
मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक title=

मुंबई : दुरुस्तीसह तांत्रिक कामासाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आलाय.. यामुळे मुलुंड स्थानकावरून डाऊन धिम्या मार्गावरील वाहतूक मुलुंड ते कल्याण दरम्यान जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. 

हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी अप-डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते ४.१० वाजेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. १०.३५ ते ३.३७ वाजेदरम्यान सीएसएमटी येथून पनवेल-बेलापूर-वाशी स्थानकांसाठी सुटणारी आणि १०.२० ते ३.४८ वाजेदरम्यान पनवेल-बेलापूर-वाशी स्थानकांतून सीएसएमटी येथे जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. 

प्रवाशांसाठी सीएसएमटी-कुर्ला, वाशी-पनवेल मार्गावर विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या भार्इंदर ते वसई रोड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ३.०० पर्यंत जम्बोब्लॉक घेण्यात आलाय. परिणामी धिम्या मार्गावरील लोकल बोरीवली-वसई रोड/विरार मार्गादरम्यान जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहे.