हार्बर, मध्य मार्गावर आज मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या मार्गावरील दुरुस्ती कामांसाठी आज हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक

Updated: Feb 10, 2019, 10:38 AM IST
हार्बर, मध्य मार्गावर आज मेगाब्लॉक title=

मुंबई - आज कुठेही प्रवास करताना रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा. मध्य रेल्वेच्या मार्गावरील दुरुस्ती कामांसाठी आज हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे अप-डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ११.४० पासून ते दुपारी ४.१० पर्यंत या मार्गावर लोकल वाहतूक सेवा बंद राहील. ब्लॉकच्या दरम्यान पनवेल आणि कुर्ला स्थानकातून विशेष गाडय़ा प्लॅटफॉर्म क्रमांक आठवरून सोडण्यात येतील. 

दुसरीकडे मध्य रेल्वेवर शहाडच्या पादचारी पुलाच्या कामासाठी कल्याण ते कसारा दरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर मात्र कोणताही मेगाब्लॉक असणार नाही. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या ब्लॉकमुळे लोकल फेऱ्या उशिराने धावणार आहेत.  

पश्चिम रेल्वे मार्गावर १०.३५ ते ३.३५ दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान, जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत.