मेट्रो-३ चे कारशेड आरेच्या जागेवरच, किरीट सोमय्यांचा दावा

मुंबई मेट्रो-३ चे कारशेड आरेच्या जागेवरच उभारण्यात येणार

Updated: Jan 17, 2020, 08:11 PM IST
मेट्रो-३ चे कारशेड आरेच्या जागेवरच, किरीट सोमय्यांचा दावा

मुंबई : मुंबई मेट्रो-३ चे कारशेड आरेच्या जागेवरच उभारण्यात येणार असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. मेट्रो कारशेड कमिटीनं आधीच्याच जागेची शिफारस केल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे. उद्धव ठाकरे सरकार मात्र हा अहवाल का उघड करत नाही असा सवालही त्यांनी केला आहे.  

दर दिवसाला १० कोटींचा फटका बसतो आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्यामुळे ५०० कोटींचं  आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.