मुंबई: म्हाडाच्या मुंबई मंडळातील घरांसाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सोडत निघणारअसल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी शनिवारी केली. 900 ते 1000 घरांसाठी ही सोडत निघणार आहे.
म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या 9,018 घरांच्या लॉटरीची सोडत शनिवारी जाहीर करण्यात आली. यावेळी म्हाडाच्या कोकण विभागाच्या घरांसाठी खरेदीदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. याविषयी मी स्वतः माहिती घेणार असल्याचे प्रकाश मेहतांनी सांगितले.
कोकण मंडळाची पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आणखी 5000 घरांची लॉटरी डिसेंबरमध्ये निघणार आहे. आज झालेल्या 9018 घरांमधील पंतप्रधान आवास योजनेमध्ये यशस्वी झालेल्या विजेत्यांची पात्रता निश्चिती सोमवार पासून होणार आहे.