मुंबईत म्हाडाच्या PMAY योजनेतील घरांच्या किंमती वाढल्या; 30 लाखांचे घर आता इतक्याला पडणार

Mumbai Mhada Lottery: मुंबईत हक्काचं घर असावं असं प्रत्येकाच स्वप्न असतं. त्यासाठी अनेकजण म्हाडावर अवलंबून असतात. याच नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 6, 2024, 12:09 PM IST
मुंबईत म्हाडाच्या PMAY योजनेतील घरांच्या किंमती वाढल्या; 30 लाखांचे घर आता इतक्याला पडणार title=
Mhada PMAY houses price Increase in Goregaon MHADA fixes price

Mumbai Mhada Lottery: म्हाडाकडून मुंबई मंडळासाठी लवकरच 2 हजार घरांची सोडत काढण्यात येणार आहे. गोरेवार, विक्रोळी, पवई या भागातील घरांच्या यात समावेश आहे. दरम्यान म्हाडाच्या मुंबई मंडळातील पहाडी गोरेगावमध्ये पंतप्रधान आवास योजनेतील घरांची किंमत 1.92 लाख रुपयांनी वाढली आहे. ऑगस्टमध्ये 2023च्या योजनेत घराची किंमत 30 लाख 44 हजार रुपये इतकी होती. मात्र, आता विजेत्या अर्जदारांना या घरांसाठी जास्त किंमत मोजावी लागणार आहे. मुंबई मंडळाच्या पहाडी गोरेगाव येथे 1,900 घर पीएमएवाय योजनेत आहेत. 

पंतप्रधान आवास योजनेतील या घरांसाठी 2023मध्ये लॉटरी काढण्यात आली होती. पीएमएवाय योजनेनुसार, ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपये इतके त्यांनी अर्ज केले होते. या घरांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र, अन्य कारणांसाठी विजेत्यांनी घरं पुन्हा म्हाडाला परत केली होती. पीएमएवायमधील 88 विजेत्यांनी घरं परत केली होती. त्यामुळं य घरांचा समावेश 2024च्या लॉटरीत केला आहे. मात्र, यावेळी घरांच्या किंमती वाढवल्या आहेत. 

पंतप्रधान आवास योजनेतील 88 घरांचा समावेश केल्यानंतर त्यांची किंमत ठरवण्यात आली आहे. यानुसार, घरांच्या किंमतीत अडिच लाखांची वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच प्रत्येक घरांच्या किंमतीत दोन लाख 52 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भात एका वृत्तपत्राने माहिती दिली आहे. 

घरांच्या किंमतीत वाढ करण्यात आल्यानंतर अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मुंबई मंडळाने किंमत कमी केली होती. मुंबई बोर्डाचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार किंमत 56 हजारांनी कमी करण्यात आली होती. आता या घरांची किंमत 32 लाख 36 हजार इतकी असणार आहे. नियमानुसार, व्याजदर लावून किंमती ठरवल्या जातात. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता एक लाख 92 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.  

ही कागदपत्र लागणार

मुंबई म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे. लॉटरीत अर्ज करण्यासाठी अर्जदारांकडे 7 कागदपत्रे असणे बंधनकारक आहे.  लॉटरीची तारीख जाहीर होण्यापूर्वी, आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अर्जदार आधार कार्ड, पॅन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, शपथपत्र, जात प्रमाणपत्र आणि त्या प्रवर्गाचे प्रमाणपत्र तयार ठेवून म्हाडाच्या वेबसाइटवर नोंदणी करू शकतात.