मनसेच्या ८ कार्यकर्त्यांना आता, ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यासह, एकूण ८ जणांना न्यायालयाने १८ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

Updated: Dec 4, 2017, 11:50 PM IST
मनसेच्या ८ कार्यकर्त्यांना आता, ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी title=

मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यासह एकूण ८ जणांना न्यायालयाने १८ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या आधी या आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. मुंबई प्रदेश काँग्रेस प्रकरणी मनसेचे ही आठही कार्यकर्ते अटकेत आहेत.

१८ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबईतील सीएसटी येथील, आझाद मैदान पोलीस स्टेशनसमोरील काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी, मनसेच्या या कार्यकर्त्यांना १८ डिसेंबरपर्यंत न्यायालयीने कोठडी सुनावली आहे. यापूर्वी त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मुंबईतील किला कोर्टाने ही कोठडी सुनावली आहे.

मुंबईतील सीएसटी येथील मुंबई प्रदेश काँग्रेस कार्यालय तोडफोड प्रकरणाला, संदीप देशपांडे यांनी मनसेचं सर्जिकल स्ट्राईक असल्याचं म्हटलं होतं.

मनसे आणि निरूपम यांच्यातील वाद

मनसे आणि काँग्रेसचे संजय निरूपम यांच्यात सध्या फेरीवाल्यांकडून फुटपाथवर होत असलेल्या अतिक्रमणावरून वाद सुरू आहेत. काँग्रेस कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड केल्यानंतर, काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी याचा 'करारा जवाब' दिला जाईल असं वक्तव्य केलं आहे.

अशोक चव्हाणांचं संयम राखून वक्तव्य

दरम्यान, राज्यातील काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे, राज्यात प्रांतीय आणि स्थानिय असा वाद करता येणार नाही, आपण सर्व भारतीय आहोत.