राज ठाकरे यांच्या नातवाची पहिली झलक; Photo नजर खिळवणारा

नातवाची पहिली झलक पाहिली? 

Updated: Apr 11, 2022, 12:01 PM IST
 राज ठाकरे यांच्या नातवाची पहिली झलक; Photo नजर खिळवणारा  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजोबा झाले. पुत्र अमित ठाकरे यांच्या पत्नी, मिताली यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला आणि पाहता पाहता राज ठाकरे यांना नातू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. राजकीय वर्तुळात आपल्या ठाकरी शैलीसाठी आणि भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या राज ठाकरे यांची एक नवी इनिंग सुरु झाल्याची प्रतिक्रिया काही हितचिंतकांनी दिली. (raj thackeray grand son first photo )

नातवाच्या जन्मापासूनच ठाकरे कुटुंबात आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. ज्यानंतर आता या चिमुकल्या राजकुमाराची पहिली झलक सर्वांनाच पाहण्याची संधी मिळाली आहे. राज ठाकरे यांचा नातू कसा बरं दिसत असेल, असा प्रश्न विचारणाऱ्यांसाठी त्यांच्या नातवाची पहिली झलक एक गोड उत्तर देऊन जात आहे. 

खुद्द अमित ठाकरे यांनीच सोशल मीडियाच्या माध्यमातून लेकाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. बाळानं करंगळी पकडल्याचं या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे. फोटोमध्ये बाळ दिसत असलं तरीही त्याचा संपूर्ण चेहरा मात्र स्पष्ट दिसत नाही. पण, तरीही बाळाची ही पहिली झकल अनेकांच्याच चेहऱ्यावर स्मित आणून गेली. 

सध्या सोशल मीडियावर ठाकरे कुटुंबातील या नव्या आणि सर्वात लहान सदस्याचा सर्वात पहिला फोटो भलताच चर्चेत असल्याचं आता पाहायला मिळत आहे. 

अमित ठाकरे यांच्या पत्नी, मिताली मुंबईच्या असल्यामुळं त्यांची प्रसूतीही इथंच झाली. 2019 मध्ये मिताली आणि अमित ठाकरे यांनी लग्नगाठ बांधली होती. जीवनातील कठीण प्रसंगापासून मिताली यांची अमित ठाकरेंना साथ मिळाली आणि त्यांचं कुटुंब आता परिपूर्ण झालं, असंच म्हणावं लागेल.