फक्त विकास नाही तर किरीटही वेडा झालायं - फुटीर मनसे नगरसेवक

फक्तं विकासच नाही तर किरीटही वेडा झालांय.' भाजप खासदार किरीट सोमय्या हे मानसिक रुग्णं झाले असून त्यांना त्वरीत वेड्यांच्या हॉस्पीटलमध्ये दाखल करावे. अशी मागणी वॉर्ड क्रमांक १३३ चे फुटीर नगरसेवक परमेश्वर कदम यांनी, थेट अप्पर पोलीस आयुक्तं लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वरळी यांच्याकडे पत्रे देऊन केली आहे.

Updated: Oct 26, 2017, 06:28 PM IST
फक्त विकास नाही तर किरीटही वेडा झालायं - फुटीर मनसे नगरसेवक  title=

मुंबई : फक्तं विकासच नाही तर किरीटही वेडा झालांय.' भाजप खासदार किरीट सोमय्या हे मानसिक रुग्णं झाले असून त्यांना त्वरीत वेड्यांच्या हॉस्पीटलमध्ये दाखल करावे, अशी मागणी वॉर्ड क्रमांक १३३ चे फुटीर नगरसेवक परमेश्वर कदम यांनी, थेट अप्पर पोलीस आयुक्तं लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वरळी यांच्याकडे पत्रे देऊन केली आहे.

 मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर बसवण्याचं किरीट सौमय्यांचं स्वप्नं पूर्ण होऊ शकले नाही. मनसेच्या सहा फुटीर नगरसेवकांनी पैसे घेऊन शिवसेनेत प्रवेश केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. अशी तक्रार सोमय्या यांनी लाचलुचपत विभागाकडे केली आहे. 
 
 त्यानंतर आता फुटीर नगरसेवकांपैकी परमेश्वर कदम यांनी पोलिसांना पत्र देऊन किरीट सौमय्यांना वेडा म्हटलंय.