'कठीण काळ आहे पण हाही काळ निघून जाईल'

अमित ठाकरेंच जनतेला आवाहन 

Updated: Apr 4, 2020, 10:01 AM IST
'कठीण काळ आहे पण हाही काळ निघून जाईल' title=

मुंबई : कठीण काळ आहे पण हाही काळ निघून जाईल,घरीच राहा सुखरूप राहा. मनसे नेते  अमित ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करून नागरिकांना घरी राहण्याच आवाहन केलं आहे. कोरोना व्हायरसमुळे सगळीकडेच एक निराशेचं वातावरण निर्माण झालं आहे. घड्याळ्याच्या काट्यावर धावणारे पाय आज एकाच ठिकाणी स्थिरावले आहेत. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सर्वात महत्वाची बाब आहे.

फेसबुकवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी त्यांच्या जेम्स आणि मुफासा या लाडक्या श्वानानं बरोबरचा फोटो अपलोड केला आहे यावेळी त्यांनी हा सर्वांसाठी कठीण काळ आहे पण हाही काळ निघून जाईल,घरीच राहा सुखरूप राहा अस लिहल आहे. सध्या सोशल मीडियावर या पोस्टला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

‘Ruff’ times right now, but we’ll get through it. #stayhome

Posted by Amit Thackeray on Friday, April 3, 2020

अमित ठाकरे यांनी शेअर केलेल्या या पोस्टला ४ हजाराहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे तर १९५ पोस्टला शेअर केलं आहे. १७९ लोकांनी या पोस्टवर कमेंट केली आहे. अमित ठाकरे राजकारणात आता सक्रीय झाले आहेत. मनसेच्या महामेळाव्यात अमित ठाकरेंच लाँचिंग करण्यात आलं आहे. खरतर अमित ठाकरेंचा तरूण वर्गात एक मोठा चाहतावर्ग आहे. लोकांना अमित ठाकरे यांच्याबद्दल कायमच एक अप्रूप आहे. ज्यादा फायदा मनसेला येत्या काळात येऊ शकतो. मुंबईतील आरे कारशेडचा मुद्दा उचलून धरला होता.