मनसे नेते अमित ठाकरे यांचं अनोखं 'व्हॅलेंटाइन डे' सेलिब्रेशन

 अमित राज ठाकरे यांनी अनोख्या पद्धतीने आज 'व्हॅलेंटाइन डे' सेलिब्रेशन केले. 

Updated: Feb 15, 2020, 03:34 PM IST
मनसे नेते अमित ठाकरे यांचं अनोखं 'व्हॅलेंटाइन डे' सेलिब्रेशन

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राज ठाकरे यांनी अनोख्या पद्धतीने आज 'व्हॅलेंटाइन डे' सेलिब्रेशन केले. त्यांनी 'व्हॅलेंटाइन डे' सेलिब्रेशन फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलाय. त्यांच्या या सेलिब्रेशनचे कौतुक करण्यात येत आहे. तसेच त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

अमित राज ठाकरे हे प्राणी प्रेमी आणि पर्यावरण प्रेमी म्हणून ही ओळखले जातात. त्यामुळे 'व्हॅलेंटाइन डे' या आजच्या प्रेम व्यक्त करण्याचा दिवशी त्यांनी अनोख्या पध्दतीने 'व्हॅलेंटाइन डे' साजरा केला आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या प्रमाणे अमित ठाकरे हे देखील श्वान प्रेमी आहेत. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने आज त्यांच्या घरी असणाऱ्या 'मुफासा' या नावाच्या त्यांच्या लाडक्या श्वानाला गुलाबाचे फुल देत 'व्हॅलेंटाइन डे' साजरा केला. खूप सुंदर जोडी. प्रेमदिनाच्या हार्दिक शुभेच्छा, अशा त्यांना चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

तसेच सर्वांनी प्राणी आणि निसर्ग यावरही माणसांप्रमाणेच प्रेम करा, असा संदेश देण्याचा प्रयत्न आपल्या कृतीतून केला.