रेल्वेत वही-पेन विकणाऱ्या 'त्या' मुलाची मनसेनं घेतली जबाबदारी, Video झालेला व्हायरल

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसेने घेतला या मुलाचा शोध... मनसेकडून मदतीचा हात

Updated: Oct 30, 2021, 11:01 PM IST
रेल्वेत वही-पेन विकणाऱ्या 'त्या' मुलाची मनसेनं घेतली जबाबदारी, Video झालेला व्हायरल title=

मुंबई : काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका मुलाचा व्हिडिओ तूफान व्हायरल होत होता. आहे त्या परिस्थितीला तोंड देत हा मुलगा ज्या पद्धतीने मेहनत करत होता. त्याच्या वयाची अशी खूपच कमी मुले समजदार असतात. त्या मुलाचं सोशल मीडियावर म्हणून कौतूक ही होत होतं.

पनवेल ते वाशी या हार्बर मार्गावर प्रवास करत ट्रेन मध्ये वह्या आणि पेन विकणाऱ्या ९ वर्षाच्या अमीन खान या मुलाचा व्हिडीओ मागच्या आठवड्यात वायरल झाला होता. वडील नसणाऱ्या आणि घरातील हालाखीची परिस्थिती मुळे हा मुलगा उदरनिर्वाहासाठी आणि शिक्षणासाठी ट्रेन मध्ये वह्या आणि पेन विकत होता. 

हा व्हिडीओ समोर आल्या नंतर या मुलाचा नवी मुंबई मनसेने शोध घेतला. इतकंच नाही तर त्याच्या महाविद्यालयापर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी मनसे (MNS) पक्षाकडून उचलण्यात आली आहे. मनसेने त्याला मदतीचा हात दिला. त्यामुळे नवी मुंबईतील मनसे कार्यकर्त्यांचं देखील कौतूक होत आहे.