मोनो भाड्याने मिळणार, लग्न वाढदिवस करा साजरा

मोनो रेलच्या (Mono Rail) उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रशासनाने भन्नाड कल्पना लढविली आहे.  

Updated: Mar 4, 2020, 01:43 PM IST
मोनो भाड्याने मिळणार, लग्न वाढदिवस करा साजरा   title=

मुंबई : मोनो रेलच्या (Mono Rail) उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रशासनाने भन्नाड कल्पना लढविली आहे. आता तुम्हाला तुमचा आनंद शेअर करता येणार आहे. येत्या काळात तुम्हाला मोनोमध्ये वाढदिवस, प्री वेडिंग शूट, लग्नाचा वाढदिवस ( Celebrate Birthday in Mono Rail) साजरा करता येणार आहे. मोनो अश्या कार्यक्रमासाठी देण्याचे एमएमआरडीए प्रशासनाच्या विचाराधीन आहे. याबाबत लवकरच अधिकृत पध्दतीने घोषणा केली जाणार आहे.

ज्वलशील पदार्थ किंवा प्रतिबंद असलेल्या गोष्टी तुम्हाला यावेळी मोनोमध्ये घेऊन जाता येणार नाहीत. तोट्यात सुरू असलेल्या मोनोच्या महसुलात वाढ करण्यासाठी अशा खासगी कार्यक्रमासाठी मोनो भाड्याने देण्यात येणार आहे. चेंबूर ते सात रस्ता अशी मोनो सुरू आहे. दिवसभरात या मोनोच्या ९७ फेऱ्या होतात. तर दिवसभरात १२ ते १५ हजार प्रवासी या मोनोमधून प्रवास करतात. मोनोचा दिवसभराचा महसूल ३ लाख २० हजार इतका आहे. यातून मोनोला अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. यावर तोडगा काढण्यासाठी नवी कल्पना आहे.

दिवसभराच्या महसुला पेक्षा किती तरी अधिक मोनोचा देखभाल खर्च आहे. त्यामुळेच महसुलात वाढ होण्यासाठी मोनोकडून असा निर्णय घेतला जात आहे. मात्र गर्दीच्या वेळा वगळता दुपारच्या सुमारास वाढदिवस, प्री वेडिंग शूट करता येणार आहे. यासाठी मोनो प्रशासनांकडून रितसर परवानगी घेत भाडे भरावे लागणार आहे. किती भाडे असेल याबाबत अद्याप निश्चिती करण्यात आलेली नाही.

मोनो रेल् वाढदिवस लग्नाचे वाढदिवस प्री वेडिंग शूट यासाठी देण्याचा विचार आहे. महसुलात वाद व्हावा हा उद्देश आहे, पण गर्दीच्या वेळा वगळता आणि कोणाला ही अडचण होणार नाही, याची दक्षता घेऊन मोनोचे डब्बे भाड्याने देण्याचे विचाराधीन आहे, अशी माहिती एमएमआरडीए प्रवक्ते डॉ. बी. जी. पवार यांनी दिली.

0