Ambani बंधूंमध्ये पडलेली वादाची ठिणगी 'या' गुरुंमुळे मिटली, आज दिसणारं वैभव त्यांचाच आशीर्वाद

आयुष्याच्या या प्रवासात प्रत्येक व्यक्तीसाठी एका अशा व्यक्तीचा शब्द प्रमाण ठरतो, ज्याचं अस्तिवंही संकटांपासून दूर राहण्यासाठी मदत करुन जातं. 

Updated: Sep 20, 2022, 02:56 PM IST
Ambani बंधूंमध्ये पडलेली वादाची ठिणगी 'या' गुरुंमुळे मिटली, आज दिसणारं वैभव त्यांचाच आशीर्वाद  title=
Mukesh And Anil Ambani Family guru ramesh bhai oza details

मुंबई : आयुष्याच्या या प्रवासात प्रत्येक व्यक्तीसाठी एका अशा व्यक्तीचा शब्द प्रमाण ठरतो, ज्याचं अस्तिवंही संकटांपासून दूर राहण्यासाठी मदत करुन जातं. भारत आणि जगभरातील उद्योग क्षेत्रामध्ये चर्चेत असणाऱ्या (Ambani) अंबानी कुटुंबासाठीसुद्धा अशाच एका व्यक्तीचं अनन्यसाधारण महत्त्वं आहे. या व्यक्तीचा सल्ला या कुटुंबासाठी अंतिम ठरतो, असं म्हणायला हरकत नाही. ही व्यक्ती दुसरीतिसरी कोणी नसून, या कुटुंबाची गुरु आहे. (Mukesh And Anil Ambani Family guru ramesh bhai oza details )

रमेशभाई ओझा (Who is Rameshbhai Oza) असं या व्यक्तीचं नाव. अंबानी कुटुंबातील बहुतांश निर्णय़ ओझा यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतरच घेण्यात येतो. गुरुंची आज्ञा अनेकदा अंबानी कुटुंबीयांसाठी प्रमाण ठरते. 

काही दिवसांपूर्वीच मुकेश आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) याच्या होणाऱ्या पत्नीच्या (Radhika Merchant) अरंगेत्रम सोहळ्याच्या वेळी ओझा यांनी हजेरी लावली होती. कारमधून उतरताच त्यांच्या स्वागतासाठी खुद्द मुकेश आणि अनिल अंबानी पोहोचले होते. (Mukesh And Anil Ambani Family guru ramesh bhai oza details)

आज दिसणारं वैभव त्यांच्यामुळेच; 'या' व्यक्तीचा शब्द अंबानी कुटुंबासाठी प्रमाण; हे आहेत तरी कोण?

कोण आहेत रमेशभाई ओझा? 
रमेशभाई ओझा हे अध्यात्मिक गुरु आहेत. (Gujrat) गुजरातच्या पोरबंदर इथं त्यांचा आश्रम आहे. 'संदीपनी वि‍द्यानि‍केतन आश्रम' असं त्यांच्या पोरबंदरमधील आश्रमाचं नाव. मुकेश अंबानी यांचे वडील धीरुभाई अंबानी यशशिखरावर पोहोचले त्या वेळेपासून ओझा अंबानी कुटुंबासोबतच आहेत. 

वाचा : SBI खातेदारांसाठी मोठी बातमी! थेट तुमच्या Saving वर परिणाम

सूत्रांच्या माहितीनुसार उद्योग क्षेत्राशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी योग्य- अयोग्य काय याचा सल्ला अंबानी कुटुंबीय ओझा यांच्याकडून घेतं. किंबहुना कुटुंबातील वाद मिटवण्यातही त्यांचं मोठं योगदान आहे. असं म्हणतात की मुकेश आणि अनिल अंबानी यांच्यात दुरावा आला असतानाच खुद्द ओझा यांनी कोकिलाबेन यांच्या सांगण्यावरून वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतला होता. 

अंबानींच्या जामनगर येथील रिफायनरी प्रकल्पाचं उदघाटनही ओझा यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. यावरूनच रमेशभाई ओझा या धनाढ्य कुटुंबासाठी नेमके किती महत्त्वाचे या प्रश्नाचं उत्तर अगदी सहजपणे मिळतं.